22.4 C
New York

Mumbai Rain : पुढील तीन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Published:

बुधवारी (ता. 18 जून) हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस (Mumbai Rain) राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशार दिला होता. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे बुधवारी रात्रीपासून मुंबईसह राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तर येत्या काही तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभगाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या पावसामुळे आणि येत्या काही तासांत जोर वाढणार असल्याने येथील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. (Mumbai Heavy Rain impact on local transport; Orange alert from Meteorological Department)

मुंबईत आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. रात्रीपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रस्ते वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला असून या मार्गावर पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. आज ऑरेंज अलर्ट मुंबईसाठी जारी करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईला ऑरेंज अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने यलोअलर्ट अपग्रेड करत दिला आहे.

कोकण किनाऱ्यावर मान्सूनचे ढग अरबी समुद्रापासून पसरले आहेत. मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्यांसह पावासाचा अंदाज आहे. वसई-विरार, बोरिवली, अंधेरी, चर्चगेट या भागातही पावसाचा जोर रात्रीपासून कायम आहे. IMD अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्रात मान्सून हंगामात पावसाचा सरासरीपेक्षा जास्त अंदाज वर्तवला आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. याआधी हवामान विभागाने एप्रिलच्या पहिल्या टप्प्यात अंदाज वर्तवला होता. त्यात 105 टक्के पावसाची शक्यता सांगितली होती. मात्र त्यानंतर त्यात सुधारणा करत हवामान विभागाने आता सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img