19 C
New York

Ravindra Chavan : कुंडमळा दुर्घटनेवरून राऊतांनी केलेल्या आरोपांना माजी मंत्री चव्हाणांचे प्रत्युत्तर

Published:

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा या पर्यटन स्थळावर रविवारी (ता. 15 जून) दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. कुंडमळा येथे असलेल्या पुलावर लोकांची गर्दी जास्त झाल्याने हा पूल कोसळला आणि या अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये एका चिमुकल्याचा समावेश आहे. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले. या पुलासाठी मंजूर झालेले आठ कोटी रुपये गेले कुठे? असा सवाल राऊतांकडून विचारण्यात आला होता. पण आज मंगळवारी (ता. 17 जून) माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राऊतांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. (Ravindra Chavan reply to Sanjay Raut allegations regarding the Kundmala Bridge collapsed accident)

सोमवारी (ता. 16 जून) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुंडमळा पूल दुर्घटनेवरून मादी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले. त्यामुळे आता या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि कुंडमळावरील पूल निर्मितीच्या निधीबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी चव्हाणांनी आज मंगळवारी (ता. 17 जून) पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण देताना माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, कुंडमळा दुर्घटना ही अत्यंत दुःखद आहे. त्यातील सर्व मृतांना आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. संजय राऊत यांनी या पुलाच्या निर्मितीबाबत काल जो विषय मांडला त्याबद्दल सांगायचे झाले तर मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे जे विषय आले, मग तो रस्त्याचा असो की पुलाचा विषय असो की अजून कोणताही विषय असो, त्या विषयाचा विचार करून तत्काळ त्याच्यावर कारवाई करावी किंवा तो लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे, असे चव्हाणांनी सांगितले.

तसेच, भाजपाचे पदाधिकारी रवींद्रे भेगडे यांनी या पुलाच्या संदर्भात जेव्हा सांगितले आणि त्याबाबतचे पत्र दिले, तेव्हा मी तत्काळ त्या पुलाच्या मंजुरीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करावी, यासाठी संबंधित खात्याला सांगितले. त्या पुलाला जवळपास आठ कोटीचा खर्च अपेक्षित होता. त्यामुळे त्या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ तरतूद करावी असे सांगितल्यानंतर संबंधित खात्यानेही तत्काळ पाऊले उचलली. त्यानंतर मी बजेटमध्ये ज्या पद्धतीने तरतूद करण्यात येते, म्हणजेच हजाराच्या तरतुदीप्रमाणे याची नोंद करण्यात आली. खरं तर जितकी तरतूद असते, त्याच्या एक हजार पट असा तो अर्थ असतो. त्यामुळे 80,000*1000 असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे हे सर्व वाचावे आणि लोकांना कळावे यासाठी आमचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोप्या भाषेमध्ये बजेट कसे वाचावे, यासाठीचे पुस्तक लिहिले आहे. पण कदाचित राऊतांनी ते पुस्तक वाचले नसावे, त्यामुळे त्यांना ती तरतूद कळाली नसावी, असा टोला चव्हाणांनी लगावला आहे.

Ravindra Chavan कुंडमळा पुलाच्या कामाला दिली होती मंजूरी…

यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कुंडमळा पुलाच्या कामाला मंजूरी दिली होती, अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली. निवडणुकीच्या आधी कुंडमळा पुलाच्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मी आज या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी चर्चा केली. सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असताना या कामाला दिरंगाई का झाली? याची चौकशी करण्यात यावी आणि यामध्ये जे कोणी दोषी अधिकारी आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, हे अपेक्षित असल्याचे यावेळी रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. तसेच आपल्या दिरंगाईमुळे जर का निष्पाप लोकांचे जर बळी गेले असतील तर ते चांगले नाही, असे म्हणत माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे या घटनेला शासन सुद्धा जबाबदार असल्याचे मान्य केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img