20.5 C
New York

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताचे कारण शोधणारा Black Box असतो तरी काय? जाणून घ्या

Published:

12 जून गुरुवारी 1.30 च्या सुमारास अहमदाबादातील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळल्याने (Ahmedabad Plane Crash) एकच खळबळ उडाली. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्यासह 230 प्रवाशी होते तर या विमानात 12 क्रू मेंबर्स देखील उपस्थित होते. माहितीनुसार या विमान अपघातामध्ये विमानातील जवळपास सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मात्र विमान अपघाताचे कारण काय? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. घटनास्थळी लष्कराचे 130 जवान बचावकार्य करत आहे. तसेच बचाव पथक विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील शोधण्याचे काम करत आहे.विमानाचे खरे कारण ब्लॅक बॉक्समुळे समोर येणार आहे.

Ahmedabad Plane Crash ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

दोन प्रकारच्या मशीन्सपासून ब्लॅक बॉक्स बनलेले एक प्रकारचे उपकरण असते. ब्लॅक बॉक्स उड्डाणाशी संबंधित महत्त्वाच्या घटनांची नोंद करतो. FDR- फ्लाइट डेटा रिसर्च या मशीनमध्ये विमानाचा वेग, उंची, इंजिनची स्थिती, उड्डाण मार्ग, पायलटने केलेल्या क्रियाकलापांसारखी तांत्रिक माहिती समाविष्ट असते. तर CVR– कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर या मशीनमध्ये पायलट आणि सह-पायलटमधील संभाषण, अलार्म ध्वनी आणि इतर महत्त्वाचे ऑडिओ पुरावे असताता. ज्याचा वापर अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय संभाषण झाले हे शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. विमान अपघातापूर्वी सीव्हीआर आणि एफडीआर ही अशी उपकरणे आहेत जी माहिती गोळा करतात. त्याच्या मदतीने तज्ञ विमानात तांत्रिक समस्या होती की मानवी चुकीमुळे अपघात झाला हे शोधतात.

Ahmedabad Plane Crash बीकन सिग्नलच्या मदतीने ब्लॅक बॉक्स शोधला जातो

ब्लॅक बॉक्स विमानात एका खास आणि अतिशय सुरक्षित ठिकाणी बसवला जातो जेणेकरून अपघातानंतरही तो सुरक्षित ठेवता येईल. आग आणि पाण्यापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी ते तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तो शोधण्यासाठी एका विशेष प्रकारच्या सिग्नलचा वापर केला जातो, ज्याला बीकन सिग्नल म्हणतात. या बीकन सिग्नलसहच ब्लॅक बॉक्स सापडतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img