12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून विराट कोहलीने (Virat Kohli) निवृत्ती घेतली होती. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. किंग कोहलीने 123 कसोटी सामन्यांमध्ये 30 शतकांमध्ये 9230 धावा केल्या. कोहलीच्या कसोटी निवृत्तीने संपूर्ण क्रिकेट विश्वाला (BCCI) एक धक्का बसला आहे. यावार रवी शास्त्री भारताचे माजी प्रशिक्षक यांनी (Ravi Shastri Statement) देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं, ते आपण सविस्तर पाहू या.
Ravi Shastri Statement रवी शास्त्री काय म्हणाले?
एका वृत्तवाहिनीने रवी शास्त्री यांची एक क्लिप शेअर केली (Cricket News) आहे, यामध्ये रवी शास्त्री यांनी म्हटलंय की, जेव्हा तुम्ही निघून जाता तेव्हा लोकांना कळते की, तुम्ही किती महान खेळाडू होता. तो गेला आणि त्याने ज्या पद्धतीने काम केले त्याचे मला दुःख झाले. मला वाटते की, हे अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आले असते. अधिक संवाद व्हायला हवा होता.
रवी शास्त्री ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 1-3 अशा पराभवानंतर म्हणाले की, त्यांनी विराट कोहलीला पुन्हा कर्णधार बनवले असते. शास्त्री आणि कोहलीच्या जोडीने भारताला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवून दिला होता. जर माझ्या हातात असतं, तर मी या वर्षी ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर लगेचच कोहलीला कर्णधार बनवले असते. कोहली आणि रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर शुभमन गिलला नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय संघ 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
Ravi Shastri Statement इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कृष्णदीप सिंग, कृष्णदीप सिंग, अरविंद, अरविंद, अरविंद आणि कृष्णा.