26.2 C
New York

ICC T20 Ranking : टी 20 रँकिंगमध्ये टीम इंडियाचा दबदबा, पहिला नंबर मात्र हुकला

Published:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून खेळाडूंची ताजी रँकिंग (ICC T20 Ranking) जारी करण्यात आली आहे. या यादीवर नजर टाकली तर यात भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. टॉप सहापैकी तीन भारतीय खेळाडू आहेत. टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू (Team India) तिलक वर्माने मोठी झेप घेतली आहे. तिलक आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वरुण चक्रवर्ती तिसऱ्या तर रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आयसीसी टी20 फलंदाजी यादीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड (Travis Head) पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे एकूण 856 गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा आहे. त्याचे एकूण 829 गुण आहेत. अभिषेकने या वर्षात इंग्लंडविरुद्धच्या टी 20 मालिकेत पाच सामने खेळले. यात त्याने एक शतक आणि एक अर्धशतक केले होते. या मालिकेतील अखेरच्या टी 20 सामन्यात त्याने 135 धावांची खेळी केली होती.

ICC T20 Ranking तिलक वर्माची मोठी झेप

तिलक वर्मानेही (Tilak Verma) मोठी झेप घेतली आहे. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे एकूण 804 रेटिंग पॉइंट्स आहेत. तिलकने या वर्षात पाच टी 20 सामने खेळले आहेत. यात त्याने एक सामन्यात 72 धावा केल्या होत्या. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचे फिल सॉल्ट आणि जोस बटलर आहेत. सहाव्या क्रमांकावर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आहे. त्याचे एकूण 739 रेटिंग पॉइंट्स आहेत. टॉप 10 यादीत भारताचे तीन फलंदाज आहेत. या व्यतिरिक्त इंग्लंडचे दोन आणि श्रीलंकेचे दोन खेळाडू आहेत.

ICC T20 Ranking गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती जोरात

टी20 गोलंदाजी यादीतही भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली दिसत आहे. या यादीत न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफी टॉपवर आहे. त्याचे एकूण 723 रेटिंग पॉइंट्स आहेत. या यादीत तीन भारतीय गोलंदाज आहेत. वरुण चक्रवर्तीनेही झेप घेतली आहे. त्याचे एकूण 706 रेटिंग पॉइंट्स आहेत. रवी बिश्नोई 674 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग दहाव्या क्रमांकावर आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img