29.3 C
New York

Maharashtra Politics : राज ठाकरे अन् फडणवीस मुरलेले मात्तबर;मनसेसोबतच्या युतीमागे मोठं राजकारण

Published:

एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी (Maharashtra Politics) जोर धरलेला असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव फिरवल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आज (12 जून) सकाळी ताज लँड या हॉटेलात या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, मनसे आणि ठाकरे यांच्यातील युती होण्याच्याक्षणी फडणवीसांच्या एन्ट्रीने ट्विस्ट आला आहे. मात्र, फडणवीस आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते मुरलेले मात्तबर राजकारणी असून, भेटीत जरी पुढच्या राजकारणाची दिशा ठरवली तरी, हे नेते बाहेर येऊन खरं सांगण्याऐवजी वेगळचं उत्तर देऊन वेळ मारून नेतील असे अनेक राजकीय जाणकारांने मत आहे.

Maharashtra Politics ठाकरेंनी सांगितलं होतं संकेत नाही बातमीच देतो

मध्यंतरी उद्धव ठाकरेंना मनसे आणि ठाकरे गटात युती होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ठाकरेंनी संकेत काय बातमीच देतो असे म्हणत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असे ठणकावून सांगितले होते. त्यांच्या या उत्तराने मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. मात्र, युती होण्याच्या अंतिमक्षणी फडणवीसांनी चक्र फिरवतं राजकीय चक्रं फिरवून शिवसेना-मनसे युतीला (MNS-Shivsena UBT Yuti) ब्रेक लावला जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics मनसेसोबतच्या युतीमागे मोठं राजकारण

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मनसेला सोबत घेण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले आहेत. यापूर्वीही अनेकदा राज ठाकरेंसोबत फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी भेट घेतली होती. मुंबई महानगरपालिकेती निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज एकत्र येणार आणि राजकारणात मोठे उलटफेर होणार, अशी चर्चा रंगली होती. हा फटका भविष्यातील राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो अशी भीती भाजपसह महायुतीतील अन्य पक्षांना आहे. त्यामुळे राज ठाकरेंचं मन आणि मतपरिवर्तन करण्यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Politics फडणवीस अन् राज ठाकरे मुरलेले मात्तबर

एकीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ताज लँड हॉटेलातील भेटीमुळे राजकीय वातावरण तापलेले असून, अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, यापूर्वी फडणवीस असो, शिंदे असो किंवा सामंतांसोबतची राज ठाकरेंनी भेट असो. या सर्व भेटींनंतर या नेत्यांसह राज ठाकरेंनी आम्ही राज्यातील गंभीर प्रश्नांवर चर्चा केल्याचे सांगितले होते. त्यामुळे जरी ताज लँडमध्ये फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युतीबाबत चर्चा जरी झालेली असली तरी, राज आणि फडणवीस हे राजकारणातील धुरंधर आणि चाणाक्ष्य राजकारणी आहेत. त्यामुळे जरी या दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला तरी मुळ भेटीला बगल देत वेगळचं उत्तर देत वेळ मारून नेतील असे मत अनेक राजकीय जाणाकार व्यक्त करत आहे. राज ठाकरे यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचं उत्तम नात आहे. दोन्ही नेते अनेकदा शिवतीर्थवर येत असतात. त्यामुळे आजची भेट झाली, तर उद्धव ठाकरे गट त्यावर काय भूमिका घेते यावर पुढची गणित अवलंबून आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img