महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन पक्ष एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा आहे. काही वर्षांपूर्वी अजित पवारांनी शरद पवारांची साठ सोडली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर दावा केला. यावेळी त्यांनी भाजपसोबत युती करत सत्तेत आले आणि उपमुख्यमंत्री झाले. पण सध्याच्या काळात पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. (Supriya Sule) गेल्या काही काळात बऱ्याचदा अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर दिसले.
तसेच, काही दिवसांपूर्वी अजित पवारांसोबत जाणार का? असे विचारले असता शरद पवार यांनी सुप्रिया सुळे पुण्यात आल्यावर निर्णय घेऊ असे म्हटले होते. मंगळवारी (10 जून) राष्ट्रवादी कॉंग्रेसचा 26 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. पण त्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्स अॅप स्टेट्स चांगलेच चर्चेत आले आहे. (Supriya Sule NCP SP Whats App Status and Political discussion with Ajit Pawar NCP) वर्धापन दिनाआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (9 जून) एक व्हॉट्स अॅप स्टेट्स ठेवले. या स्टेटसमध्ये “आईला सगळंच माहिती असते, माझे पालक क्वचितच मला सल्ला देतात.
आईने मला जो सल्ला दिला, तिच गोष्ट मी रोज स्वतःला सांगते सहन करायला शिक.” तसेच, “आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचे. त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. आपण काहीही करु शकत नाही. परिस्थिती आपल्या हातात नसते, तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचे. कर्तव्य करत राहायचं. आपले संस्कार कधीही विसरायचे नाही.” त्यांच्या या व्हॉट्स अॅप स्टेटसची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.