29.6 C
New York

Sonali Bendre : राज ठाकरेंसोबतच्या नात्यावर सोनाली बेंद्रेंचा प्रथमच खुलासा

Published:

बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री आणि राजकीय नेत्यांच्या अफेअरच्या अनेकदा चर्चा समोर येतात. अशीच चर्चा 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) आणि तत्कालिन शिवसेनेचे नेते आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या अफेअरची चर्चा होती. राज ठाकरेंसोबत सोनाली बेंद्रेंचे नाव जोडले गेले होते. 1996 मध्ये राज ठाकरे यांनी मुंबईत मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टचे आयोजन केले होते. यामध्ये सोनाली बेंद्रे एकत्र दिसले होते. त्यानंतर तब्बल 30 वर्षानंतर शिवाजी पार्कातील मनसेच्या कार्यक्रमात राज आणि सोनाली एकत्र दिसले होते. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राज ठाकरेंसोबतच्या नात्यावर सोनाली बेंद्र यांनी नुकतेच मौन सोडले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या वर्षी 27 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथे अभिजात मराठी भाष गौरव दिन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. तब्बल तीन दशकानंतर सोनाली आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसले होते. यावेळी मंचावर जाण्यापूर्वी सोनाली बेंद्र आणि राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोनाली बेंद्रे या डोळ्याने खुणावत आहेत आणि त्यानंतर राज ठाकरे मंचावर आले, असा तो व्हिडिओ आहे. यावर सोनाली बेंद्रे यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. राज ठाकरेंसोबतच्या नात्यावर सोनाली बेंद्रे यांनी सविस्तर उत्तर दिले.

Sonali Bendre ठाकरे कुटुंबासोबत अनेक दशकांचे नाते – सोनाली बेंद्रे

एएनआयसोबतच्या मुलाखतीत सोनाली बेंद्रे यांना राज ठाकरेंसोबतच्या व्हायरल व्हिडिओ संबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिनेत्री सोनाली बेंद्रे म्हणाल्या, ‘त्या व्हिडिओबद्दल बोलायचे तर मी माझ्या बहिणीसोबत बोलत होते. ती तिथेच उभी होती.’ अभिनेत्री सोनाली म्हणाल्या की, लोक जेव्हा अशा प्रकारची चर्चा करतात तेव्हा चांगलं वाटत नाही. कारण त्यात कुटुंब सहभागी असतात. अनेक लोक सहभागी असतात. ठाकरे कुटुंबासोबत आमचे अनेक दशकांचे संबंध आहेत. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, त्यांच्यासासू आणि माझी मावशी या सख्ख्या मैत्रिणी. शर्मिला ठाकरे यांच्या आईसोबतही आमचे संबंध. त्यांच्याकडे मी दहा दिवस मुक्कामाला होते. कारण ती माझ्या आईची छोटी बहीण होती. असंही सोनाली बेंद्रे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img