26.1 C
New York

Devendra Fadnavis : “जागावाटपात ओढाताण झालीच तर शरद पवारांचा सल्ला घेऊ”, फडणवीसांचा खोचक टोला

Published:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) महाविकास आघाडी म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढाव्यात (Local Body Elections) अशी माझी इच्छा असल्याचे म्हटले होते. या निवडणुकीत महायुतीचं जागावाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही, असेही सांगितले होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी काल पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. जर काही ओढाताण जागावाटपात झालीच तर आम्ही शरद पवारांचा सल्ला घेऊ असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.

Devendra Fadnavis काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांनी काल पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. या चर्चेत त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर मत व्यक्त केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात लवकरच होणार आहेत. यावर बोलताना पवार म्हणाले, माझी इच्छा आहे की महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीमध्ये जागावाटप व्यवस्थित होईल असं मला वाटत नाही.

फडणवीस खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेवर विचारले असता म्हणाले, संजय राऊत काय बोलतात यावर मला प्रश्न विचारत जाऊ नका. जर माझ्या लेव्हलचा असेल ज्याला राजकारण समजतं, ज्याला खरं बोलता येतं असा कुणी व्यक्ती असेल तरच मला प्रश्न विचारत जा. नाहीतर तुमचाही वेळ वाया जातो आणि माझाही.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होईल अशी चर्चा सुरू आहे. यावर फडणवीस म्हणाले, मला बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना व्हायचं नाही. ते दोन पक्ष आहेत. ते दोघे भाऊ आहेत. काका पुतणे आहेत. त्यांनी त्यांचं ठरवायचं आहे. जर ते एकत्र आले तर मी प्रतिक्रिया देईल. पण आता तरी मला त्याबाबत विचारू नका. या प्रकरणात मला हात दाखवून अवलक्षण करायचं नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img