18.5 C
New York

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात, राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांची माहिती

Published:

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तीन टप्प्यात (Local Body Election) घेण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी ‘आपलं महानगर’ शी बोलताना दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. अडीच- तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिले होते. त्यामुळे निवडणुका ऑक्टोबरपर्यंत घेण्याचा आयोगाचा मानस आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या 18 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाकडे त्यावेळी निवडणूक घेण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करणार असल्याचेही वाघमारे यांनी स्पष्ट केले. (local body elections will be held in three phases state election commissioner dinesh waghmare informs)

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तयारी सुरू केली आहे. लवकरच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची राज्य सरकारकडून प्रभाग रचना अंतिम केली जाईल. प्रभाग रचना २०११ च्या लोकसंख्येनुसार होईल. महापालिकेसाठी संबंधित आयुक्त तर नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून ही प्रक्रिया पार पाडली जाईल. आरक्षण सोडत आणि त्यानंतर मतदारयादी प्रभाग रचना झाल्यानंतर अंतिम केली जाईल. निवडणूक कार्यक्रम ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर घोषित होईल. या दरम्यान, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत आपण स्वतः विभागनिहाय दौरा करून बैठक घेऊन निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेणार असल्याचे वाघमारे म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी पावसाचा अंदाज घेतला जाईल. हवामान खात्याच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी त्यासाठी चर्चा करण्यात येईल, असे वाघमारे म्हणाले. मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी पॅनल पद्धत नाही. येथे प्रत्येक प्रभागनिहाय निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी ईसीआयकडून ६५ हजार मतदान यंत्रे घेण्यात येणार आहेत. स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवाराच्या निवडणूक खर्चात वाढ करण्याची मागणी अद्याप राजकीय पक्षांकडून आलेली नाही. अशी मागणी आली तर निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबत विचार केला जाईल, असेही दिनेश वाघमारे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

महानगरपालिका

एकूण महानगरपालिका- 29 (जालना आणि इचलकरंजी नवनिर्मित)
प्रशासक असलेल्या महानगरपालिका- 29

नगरपरिषदा

एकूण नगरपरिषदा- 248
प्रशासक असलेल्या म्हणजे मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित नगरपरिषदा- 248

नगरपंचायती

एकूण नगरपंचायती- 147
प्रशासक असलेल्या म्हणजे मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित नगरपंचायती- 42
प्रशासक असलेल्या एकूण नगरपरिषदा आणि नगरपंचायती (248+42)- 290

जिल्हा परिषदा

एकूण जिल्हा परिषदा- 34
प्रशासक असलेल्या जिल्हा परिषदा – 32

पंचायत समित्या

एकूण पंचायत समित्या- 351
प्रशासक असलेल्या पंचायत समित्या – 336

(मे 2027 मध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीची मुदत संपणार आहे)

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img