25.2 C
New York

Thackeray MNS Alliance : युतीवर मनसेचं मौन, आदित्य ठाकरेंने दिला हिरवा कंदील, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

Published:

मागील दोन महिन्यांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर राज ठाकरे (Thackeray MNS Alliance) यांच्याकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तर मागील दोन आठवड्यांपासून आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत (MNS) युतीवर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहे.

Thackeray MNS Alliance मनसेसोबत युती करण्यास तयार

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी मनसेसोबत युती करण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलंय. तर युतीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. ते पुढे पाऊल टाकण्यास तयार आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं (Maharashtra Politics) आहे. आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, सुनील प्रभू, अंबादास दानवे यांनी सुद्धा मनसेसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु मनसेकडून अजून कोणतंही अधिकृत विधान समोर आलेलं नाही.

Thackeray MNS Alliance स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

पुढील काही दिवसांत स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र आल्यानंतर राजकीय समीकरण बदलतील. युतीच्या चर्चेची सुरूवात राज ठाकरे यांच्या मुलाखतीतून झाली होती. परंतु याचा अर्थ प्रत्येकाने (Thackeray MNS Alliance) वेगळा घेतला, असं देखील त्यांनी नंतर स्पष्ट केलं होतं. मनसे नेत्यांकडून देखील ठाकरेंसोबतच्या युतीवर अधिकृत विधान समोर आलेलं नाही. त्यामुळे ठाकरेंसोबत युतीला मनसेकडून साद मिळणार का? याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Thackeray MNS Alliance चर्चेसाठी पुढाकार कोण घेणार?

प्रत्यक्षात ठाकरे मनसेच्या चर्चेसाठी पुढाकार कोण घेणार का? पडद्यामागे नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजून गुलदस्त्यात आहे. मागील काही दिवस संजय राऊत सातत्याने एकत्र येण्याची भूमिका मांडत आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या अटी शर्तींमुळे अजूनच कन्फ्यूजन वाढत आहे. राज ठाकरे यांनी देखील एका मुलाखतीत, आपल्या वक्त्यव्याचा वेगळा अर्थ काढला, असं म्हटलं होतं. त्यामुळे अजूनच पेच वाढला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img