विराट कोहली आणि रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील निवृतीनंतर अखेर शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार घोषित करण्यात आले आहे. आज बीसीसीआयकडून (BCCI) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिल (Shubman Gill) भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे तर यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) उपकर्णधार असणार आहे. गिल हा टीम इंडियाचा चौथा सर्वात तरुण कर्णधार बनला आहे. तर इंग्लंड दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना संधी मिळालेली नाही.
तर दुसरीकडे इंग्लंड दौऱ्यासाठी रणजीमध्ये शानदार कामगिरी करणारा करुण नायरा देखील संधी देण्यात आली तर साई सुदर्शन देखील भारतीय संघात दिसणार आहे.
Shubman Gill इंग्लंड दौऱ्यासाठी 16 सदस्यीय भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार) यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, आकाशदीप, कुलदीप यादव.