9.4 C
New York

Shakti cyclone : मुंबईत पावसाची हजेरी, शक्ती चक्रीवादळामुळे रेड अलर्ट जारी

Published:

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आजूबाजूच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. शनिवारी (ता. 17 मे) सकाळीच माहिम, माटुंगा, दादर आणि आजूबाजूच्या भागांत पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे कामावर निघालेल्यांची तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ऊन, सावलीचा खेळ पाहायला मिळत आहे. (Shakti cyclone) गुरुवारी मुंबईत ढगाळ वातावरण तयार झाले होते, त्यामुळे पाऊस हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ‘शक्ती’ चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, रायगडसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, अंदमान समुद्रावर हवेचे चक्राकार वारे निर्माण झाल्याचे निरीक्षण केले आहे. त्यामुळे आता 16 मे ते 22 मे यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. तर, 23 मे ते 28 मे दरम्यान ही प्रणाली आणखी शक्तिशाली होऊन चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते असा अंदाज आहे. त्याला ‘शक्ती’ असे नाव देता येईल. आयएमडीने या संदर्भात एक निवेदनही जारी केले. जर ते एक शक्तिशाली चक्रीवादळ असेल तर ते भयानक असू शकते, असे म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, 23 मे ते 28 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात शक्ती चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आयएमडीने अद्याप चक्रीवादळ तयार झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. सध्या तरी हे सांगणे कठीण आहे की ही प्रणाली प्रत्यक्षात चक्रीवादळात रूपांतरित होईल की नाही. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी पोहोचण्याची शक्यता आहे, जो सहसा १ जून रोजी येतो.

राज्यात ‘अवकाळी’चा मुक्काम वाढला, आजही जोर’धार’

तसेच, भारतीय हवामान खात्याने मुंबई, रायगडसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. जोरदार पाऊस, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता या वादळामुळे आहे. अंदमान समुद्र, निकोबार बेट, दक्षिण बंगालचा उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागातनैऋत्य मान्सून दक्षिण दाखल झाला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, आसाम, बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रात देखील दुसरीकडे, हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. सर्व भागातून येत असलेले आद्रतायुक्त वारे आणि दुपारपर्यंत उन्हामुळे निर्माण झालेले बाष्प यांच्या संयोगातून राज्यभर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्किम, आसाम या राज्यामध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img