राज्यात गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ताजी (Crime News) माहिती हाती आली आहे. तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे याला बेड्या ठोकल्या आहेत. जमदाडेला तुळजापुरातील कामठा येथून अटक करण्यात आली. यानंतर आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. जमदाडेच्या अटकेनंतर या प्रकरणात एकूण अटक आरोपींची संख्या 16 झाली आहे. परंतु यातील काही आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
याबाबत आधिक माहिती अशी, फेब्रुवारी महिन्यात तामलवाडी पोलिसांनी तुळजापूर शहरात येणाऱ्या एमडी ड्रग्जवर मोठी कारवाई केली होती. या कारवाईत सुरुवातीला तीन संशयितांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. नंतर यात आणखी 33 जणांचा सहभाग आढळून आला. पोलिसांनी या लोकांना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली. तर आणखी
या प्रकरणात पोलिसांनी दहा हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. शरद जमदाडेच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी महत्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे. पंचायत समितीचा माजी उपसभापतीच या रॅकेटमध्ये सहभागी होता. ही गोष्ट धक्कादायक आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी बड्या माशांची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात आणखी काही आरोपी अजूनही मोकाटच आहेत.