16 C
New York

Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी घेतलं 55 बँकांकडून सिंडिकेटेड लोन, आकडा वाचून व्हाल थक्क

Published:

आशियातील आघाडीचे उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी (Mukesh Ambani) कर्ज घेतलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) 2.9 अब्ज डॉलर्स (सुमारे 25,000 कोटी रुपये) चे परदेशी कर्ज घेतले आहे. हे या वर्षातील भारतातील सर्वात मोठे परदेशी कर्ज मानले जाते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार हे कर्ज 55 बँकांच्या गटाने सिंडिकेटेड स्वरूपात दिले ((Mukesh Ambani Loan) आहे, ते या वर्षी आशियातील कंपनीला दिलेले सर्वात मोठे सिंडिकेटेड कर्ज आहे.

मुकेश अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने मोठे कर्ज घेतले आहे. सुमारे 55 बँकांनी मिळून हे कर्ज दिले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे रेटिंग भारत सरकारच्या रेटिंगपेक्षाही चांगले आहे. एखाद्या कंपनीचे रेटिंग तिच्या देशापेक्षा चांगले असते, असे क्वचितच घडते. मूडीज रेटिंग्जने रिलायन्सला Baa2 रेटिंग दिले आहे, फिच रेटिंग्जने BBB रेटिंग दिले आहे. याचा अर्थ असा की, कर्ज परतफेड करण्यात रिलायन्सला कोणतीही अडचण येणार नाही. बँका आणि गुंतवणूकदार रिलायन्सला सुरक्षित मानतात.

या करारामुळे रिलायन्सची आर्थिक विश्वासार्हता तर मजबूत होतेच, शिवाय जागतिक बाजारपेठेत भारतीय कंपन्यांचे स्थान किती मजबूत आहे, हे देखील दिसून येते. ब्लूमबर्गच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजने हे कर्ज दोन भागात घेतले आहे. पहिल्या भागाची किंमत 2.4 अब्ज डॉलर्स आहे, तर दुसऱ्या भागाची किंमत 67.7 अब्ज येन आहे. हा करार 9 मे रोजी झाला. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजला 2025 पर्यंत व्याजासह एकूण 2.9 अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडावे लागेल.

Mukesh Ambani सिंडिकेटेड कर्ज म्हणजे काय?

सिंडिकेटेड कर्ज म्हणजे, जेव्हा अनेक बँका एकत्रितपणे एखाद्या कंपनीला कर्ज देतात. यामुळे जोखीम विभागली जाते. हे कर्ज दोन भागात विभागले गेले आहे, पहिला भाग 2.4 अब्ज डॉलर्स आणि दुसरा भाग 67.7 अब्ज येन (सुमारे $462 दशलक्ष) चा आहे. हा करार 9 मे रोजी अंतिम झाला.

Mukesh Ambani सर्वात मोठे जागतिक कर्ज

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार आशिया-पॅसिफिक प्रदेशात (जपान वगळता) कर्ज देण्याची पातळी यावर्षी 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे, आतापर्यंत फक्त 29 अब्ज डॉलर्सचे कर्ज व्यवहार झाले आहेत. अशा परिस्थितीत, रिलायन्स इंडस्ट्रीजचा हा करार गुंतवणूकदारांसाठी विश्वासाचे मोठे लक्षण आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img