14.2 C
New York

China Earthquake : चीन पुन्हा हादरला! भूकंपाचे जोरदार धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Published:

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात पाकिस्तानला पाठिंबा देणारे जगातील देश आता निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात आहेत. तुर्की आणि चीन या दोन्ही ठिकाणी भूकंपाचे धक्के (China Earthquake) जाणवत आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनएससी) सांगितले की, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी होती. सुरुवातीच्या माहितीनुसार आज सकाळी साडे सहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले. भूकंपाचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NSC) नुसार, गुरुवारी संध्याकाळी तुर्कीयेमध्ये भूकंपाचे धक्के (Earthquake Magnitude) जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजली गेली. तुर्कीच्या मध्यवर्ती भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राजधानी अंकारामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

गेल्या एका आठवड्यात जगातील अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तान, चीन आणि तुर्की व्यतिरिक्त इतर अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी रात्री 1 वाजता अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 मोजण्यात आली. सध्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले.

China Earthquake तुर्की आणि चीनचा पाकिस्तानला पाठिंबा

भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या संघर्षात, तुर्की आणि चीनने भारताविरुद्ध पाकिस्तानला जोरदार पाठिंबा दिला. या पाठिंब्याने पाकिस्तानला काहीही फायदा झालेला नाही. कारण चीनने दिलेली शस्त्रे कुचकामी ठरली आणि भारताने ती नष्ट केली. तर तुर्कीने हे ड्रोन पाकिस्तानला विकले. हे ड्रोन खूप शक्तिशाली असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु भारतीय संरक्षण यंत्रणेसमोर ते देखील नष्ट झाले.

China Earthquake भूकंपानंतर काय करावे?

भूकंपामुळे गॅस लाईन्सचे नुकसान होऊ शकते, म्हणून लाईटर किंवा काड्या वापरू नका.
भूकंपानंतरच्या धक्क्यांसाठी तयार राहा.
जर तुम्ही किनारपट्टीच्या जवळ राहत असाल तर समुद्रकिनाऱ्यापासून दूर रहा.
भूकंपांमुळे धोकादायक त्सुनामी आणि पूर येऊ शकतात, म्हणून सतर्क रहा.
काळजीपूर्वक गाडी चालवा.
आपत्कालीन योजना तयार करा.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img