13.5 C
New York

India Pakistan Attacks : भारताने पाकिस्तानवर अचूक हल्ले केले, न्यू यॉर्क टाइम्सने पाकिस्तानचा केला पर्दाफाश

Published:

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांना (India Pakistan Attacks) यशस्वीरित्या लक्ष्य केले. आता आंतरराष्ट्रीय आणि पाश्चात्य माध्यमांनाही (India Pakistan War) हे मान्य करावे लागत आहे. स्फोट झालेल्या ठिकाणांचे फोटो जसजसे बाहेर येत आहेत, तसतसे याची अधिकाधिक पुष्टी होत आहे.

अमेरिकेतील दैनिक वृत्तपत्र न्यू यॉर्क टाईम्स (New York Times) नेही आता त्यांच्या एका अहवालात हे ठळकपणे प्रकाशित केलंय. पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानाच्या स्पष्ट उपग्रह प्रतिमा येत आहेत. परंतु पाकिस्तानने भारताचे नुकसान करण्याचे केलेले दावे (Pakistan Military Facilities) पूर्णपणे सिद्ध झालेले नाहीत. न्यू यॉर्क टाइम्सने उपग्रह प्रतिमांचा हवाला देत म्हटलंय की भारताने पाकिस्तानच्या विमानतळांना आणि लष्करी सुविधांना अतिशय स्पष्टपणे लक्ष्य केले

उपग्रह प्रतिमांच्या आधारे न्यू यॉर्क टाईम्सने पाकिस्तानचा पर्दाफाश केलाय. भारतातील ज्या ठिकाणी पाकिस्तानने हल्ला केल्याचा दावा केला आहे, त्या ठिकाणांच्या कोणत्याही स्पष्ट उपग्रह प्रतिमा नाहीत, असं त्यांनी अहवालात (Operation Sindoor) म्हटलंय. भारत सरकारनेही पुन्हा एकदा सांगितले आहे की, त्यांनी अतिशय अचूक हल्ले केले. जेणेकरून भारतीय सैन्याला जिथे मारायचे होते तिथे लक्ष्य गाठता येईल. कोणत्याही नागरी क्षेत्राला इजा होऊ नये.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा एअरबेसवरील धावपट्टीच्या दोन भागांवर हल्ला झाल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. सरगोधा एअरबेसवरील हल्ल्यापूर्वी आणि नंतरचे फोटोही या वृत्तपत्राने प्रकाशित केले आहेत. भोलारी एअरबेस पाकिस्तानातील कराचीपासून 100 मैलांपेक्षा कमी अंतरावर आहे. भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी तेथील विमानाच्या हँगरवर अचूक हल्ला केला. छायाचित्रांवरून असं दिसून येतंय की, हँगर क्षेत्राचे स्पष्टपणे नुकसान झालंय.

न्यू यॉर्क टाइम्सने अगदी स्पष्टपणे लिहिलंय की, पाकिस्तानने ज्या ठिकाणी हल्ला केल्याचा दावा केलाय. त्या ठिकाणांचे कोणतेही स्पष्ट उपग्रह प्रतिमा नाहीत. पाकिस्तानी अधिकारी म्हणतात की त्यांच्या सैन्याने भारताचा आदमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केला. पण 12 मे रोजी काढलेल्या छायाचित्रात या एअरबेसवर कोणतेही नुकसान झालेले दिसत नव्हते, असंही न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img