14.7 C
New York

Pune Traffic : अवैध पार्किंगवर होणार थेट कारवाई, पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितला प्लॅन…

Published:

पुण्यात अवैध पार्किंग (Illegal Parking) हा दिवसेंदिवस गंभीर विषय होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा आणि मनस्तापाचा सामना करावा लागतो. यामुळे आता अवैध पार्किंगविरोधात थेट कारवाई होणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. पुण्यातील (Pune) अवैध पार्किंगला कसा आळा घालायचा? याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे, एका आयोजित कार्यक्रमात त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाईचा (Police Commissioner Amitesh Kumar) थेट प्लॅन सांगितला आहे.

लक्झरी बस रस्त्यावर उभं करतात. डंपर चालक पकडला तर त्याला शंभर-दोनशे रूपयांनी त्यांना काहीच फरक पडत नाही. डंपर, लक्झरी बस या अमान्य आहेत. जड वाहतूकीला डोळे बंद करून जावू द्यायचं, हे योग्य (Pune Police) नाही. अशा वाहतूक मोफत प्रवेश दिल्याने सुरक्षिततेवर परिणाम होतो, असं देखील त्यांनी सांगितला. 50 ते 60 टक्के अपघात जड वाहतुकीमुळे होते.

लक्झरी बसच्या मालकाला पोलीस स्टेशनला बसवा, त्याला सहा महिने सोडू (Pune Traffic) नका. दुसरं म्हणजे, लपून-छपून कारवाई करणे. जी कारवाई करायची म्हणजे ती सरळ रस्त्यावर उभी राहून करा. तुम्ही आरामात कारवाई करा. सीसीटीव्ही कॅमेरा, ई-चालान असे अनेक पर्याय आहेत. पुणे शहराची स्थिती बघून प्रत्येक गाडीला उभं करून विचारपूस करणं योग्य नाही.

ई-चालानची कारवाई करायची आहे, त्यांना एखादा दिवस निश्चित करून सगळ्या पोलिसांना बाहेर काढू आणि कारवाई करू. मोठे मोठे चालान, पन्नासपेक्षा जास्त चालान बसलेल्यांना घरातून बाहेर काढून बोलावून घेवू. परंतु रस्त्यावर पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण त्या दृष्टिकोनातून कारवाई करणार, असा विश्वास देखील अमितेश कुमार यांनी बोलून दाखवला.

आज आपण रस्त्यावर गेल्यास हॉटेल्स, पार्किंग सगळा बेशिस्तपणा चालू आहे. पार्किंगसाठी कॉर्नरवर शंभर मीटर बॅन आहे. कोणाला काही दिसत नाही, बारवाल्याला सांगा दुकानाबाहेर रस्त्यावर गाड्या दिसल्या तर तीन दिवसांसाठी बार बंद राहील. ज्यांची दारूची दुकानं आहेत, त्यांना असं सांगा. आयकॉनिक रोड तरी व्यवस्थित दिसतील, अशी अपेक्षा देखील अमितेश कुमार यांनी यावेळी बोलून दाखवली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img