22 C
New York

Delhi Bus Fire : 80 प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाणाऱ्या बसला लागली आग, 5 जणांचा होरपळून मृत्यू

Published:

एका बसचा मोठा अपघात उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये किसान (Bus Catches Fire) पथवर झालाय. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अनेकांनी उडी मारून आपले प्राण वाचवले. लखनऊमध्ये चालत्या बसमध्ये भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार ही बस बिहारहून दिल्लीला (Delhi) जात होती. पाच जणांचा होरपळून या अपघातात मृत्यू (Delhi Bus Fire) झालाय. मृतदेह शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आले आहेत. अपघातावेळी 80 प्रवासी बसमध्ये होते, त्यापैकी अनेकांनी उडी मारून प्राण वाचवल्याचं सांगण्यात येतंय.

एका डबल-डेकर बसला दक्षिण विभागातील मोहनलालगंज पोलिस स्टेशन परिसरातील किसान पथवर भीषण आग लागली. त्यानंतर अर्धा डझन अग्निशमन दलाच्या गाड्यांनी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. मोठा पोलिस बंदोबस्त मोहनलालगंज आणि पीजीआयसह घटनास्थळी उपस्थित होता.

पोलिसांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, बस क्रमांक- UP17AT6372 बुधवारी दुपारी साडेबारा वाजता बिहारमधील बेगुसराय येथून दिल्लीला निघाली. रात्री 12 वाजता प्रवाशांना गोरखपूरमध्ये बसवण्यात आले. लखनौ आउटर रिंग रोड (किसान पथ) वर काटे भिट गावाजवळ गुरुवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास आग लागली. बसमध्ये पडदे होते. यामुळे आग वेगाने पसरली. आगीत प्रवासी अडकले होते. चार मृतांची ओळख पटली आहे. तर मृतांपैकी एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

Delhi Bus Fire मुख्यमंत्र्यांनी घेतली अपघाताची दखल

दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की, लखनऊ जिल्ह्यात बसला आग लागल्याने झालेल्या अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या शोकाकुल कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने जखमींना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img