22.8 C
New York

Pakistan Spy : ‘या’ नंबरपासून सावधान! तुम्ही पाकिस्तानी हॅकर्सच्या निशाण्यावर

Published:

भारतात सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान एक गंभीर सायबर सुरक्षेचा धोका समोर आलाय. भारतीय सुरक्षा संस्थांनी असा इशारा दिला आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था (PIO) भारतीय नागरिकांना आणि पत्रकारांना 7340921702 या भारतीय मोबाईल क्रमांकावरून कॉल (Pakistan Spy) करत आहे. या कॉलमध्ये भारतीय संरक्षण अधिकारी म्हणून स्वतःची ओळख करून देऊन संवेदनशील आणि गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बनावट कॉलद्वारे भारताची गोपनीय माहिती मिळवण्याचा कट रचला (India Pakistan War) जात आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कॉल विशेषतः ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय लष्करी तळांवर अलिकडेच झालेल्या हल्ल्यांना पाकिस्तानने दिलेल्या प्रतिसादाबद्दल माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने केले जात आहेत.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतातील सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तानच्या इंटेलिजेंस ऑपरेशन्स (PIO) कडून एक नवीन युक्ती वापरली जात आहे. हे पीआयओ भारतीय पत्रकार आणि नागरिकांशी “+91 7340921702” या व्हॉट्सअॅप क्रमांकाचा वापर करून संपर्क साधत आहेत. भारतीय संरक्षण अधिकारी असल्याचे भासवत आहेत. कृपया अशा बाबींना बळी पडू नका, असा इशारा भारतीय अधिकाऱ्यांनी एका निवेदनात दिला आहे.

Pakistan Spy सापळा कसा रचला जातोय?

फोन करणारा व्यक्ती हिंदी/इंग्रजीमध्ये बोलतो. स्वतःची ओळख भारतीय लष्कर किंवा गुप्तचर विभागातील अधिकारी म्हणून करून देतो. तो मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह पद्धतीने संवाद साधतो, जेणेकरून समोरची व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवू शकेल.

Pakistan Spy अशा परिस्थितीत आपण काय करायचं?

जर तुम्हाला 7340921702 या क्रमांकावरून संपर्क आला किंवा कोणताही संशयास्पद व्हॉट्सअॅप/कॉल आला तर तो कॉल ताबडतोब डिस्कनेक्ट करा. सुरक्षा एजन्सींना कळवा. तुमचे स्रोत, विश्लेषण किंवा माहिती कोणासोबतही शेअर करू नका.

Pakistan Spy कोणता धोका?

राष्ट्रीय सुरक्षेला धोका: अशा कारवायांमुळे देशाच्या संरक्षण आणि कारवायांशी संबंधित माहिती थेट शत्रूला मिळू शकते.
सायबर हेरगिरी: बनावट ओळखी वापरून सोशल इंजिनिअरिंगद्वारे संवेदनशील डेटा चोरणे ही आधुनिक हेरगिरीची एक गंभीर पद्धत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img