13.7 C
New York

SSC Result : 10 वीचा राज्याचा निकाल 94.10 टक्के; यंदाही मुलींचीच बाजी

Published:

12 वीच्या निकालानंतर सर्वांना उत्सुकता होती ती 10 वीच्या (SSC Result) निकालाची. आज मंगळवारी (ता. 13 मे) दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. पण त्याआधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून या निकालासंदर्भतील पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर आज (दि.13) संपली असून, बोर्डाकडून विभागवार निकालची माहिती देण्यात आली. मुलींनीच बोर्डाच्या परिक्षेत यावेळीदेखील बाजी मारली असून राज्याचा एकूण निकाल टक्के 94.10 लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकाल १.७१ टक्क्याने कमी झाली आहे.

SSC Result विभागवार निकाल खालीलप्रमाणे :

कोकण: ९८.८२ टक्के
कोल्हापूर: ९६.८७ टक्के
मुंबई: ९५.८४ टक्के
पुणे: ९४.८१ टक्के
नाशिक : ९३.४ टक्के
अमरावती: ९२.९५ टक्के
छत्रपती संभाजी नगर: ९२.८२ टक्के
लातूर : ९२.७७ टक्के
नागपूर : ९९.७८ टक्के

SSC Result कोकण विभागाची बाजी, यंदाही राज्यात मुलीच आघाडीवर

यंदा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला असून, कोकण विभागाने पहिल्या नंबरवर असून, कोकणाचा निकाल ९८.८२ टक्के लागला आहे. तर, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के इतका लागला असून, यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. यात मुलींचा निकाल 96.14 टक्के तर, मुलांचा निकाल 92.31 टक्के इतका लागला आहे.

SSC Result कुठे पाहाल निकाल?

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

SSC Result महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो करा

१. सगळ्यात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या वेबसाइटवर जा.

२. वेबसाइटच्या होमपेजवर, महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५ लिंकवर क्लिक करा.

३. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. तिथे तुम्ही तुमचे लॉगिन डिटेल्स (नाव, हॉल तिकीट क्रमांक ) भरा आणि सबमिट वर क्लिक करा.

४. यामुळे तुम्ही तुमचा निकाल ऑनलाईन पाहू शकता.

५. सगळी माहिती बरोबर आहेत का ते तपासा.

६. निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img