दक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू (Samantha prabhu) तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटानंतर ती स्वतःमध्ये मोठा बदल घडवून आणत पुन्हा एकदा करिअरमध्ये यश मिळवत आहे. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत (Raj Nidimoru) दिसून आली. या फोटोमुळे सोशल मीडियावर ती पुन्हा एकदा प्रेमाच्या चर्चेच्या भोवऱ्यात अडकली आहे.
तिने दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “हा एक लांब प्रवास होता, पण आम्ही इथे आहोत. नवीन सुरुवात. #’शुभम’ ९ मे रोजी प्रदर्शित होईल.” या पोस्टनंतर अनेकांना वाटू लागलं की ती राज निदिमोरूसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, सत्य काहीसं वेगळंच आहे. समांथा आता अभिनेत्रीपलीकडे जाऊन निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू करत आहे. तिचा पहिला प्रॉडक्शन प्रोजेक्ट म्हणजे ‘शुभम’, (Shubham) जो ९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तिच्याच प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तयार करण्यात आला आहे आणि राज निदिमोरू याच्या सहकार्याने त्याचा प्रमोशन होत आहे.
राज निदिमोरू याला पूर्वीपासून ओळखलं जातं आहे ते राज आणि डी.के. या प्रसिद्ध दिग्दर्शक जोडगोळीचा भाग म्हणून. याआधी त्यांनी ‘द फॅमिली मॅन’, (The Family Man) ‘फर्जी’ यांसारख्या यशस्वी वेब सीरिज दिल्या आहेत. तो श्यामली देसोजीसोबत विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. याआधीही समांथा आणि राज यांना *पिकलबॉल टीम “चेन्नई सुपर चॅम्प्स” च्या कार्यक्रमात एकत्र पाहण्यात आलं होतं, ज्यामुळे त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. पण दोघांनीही यावर अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
समांथाने तिचं पहिलं लग्न अभिनेता नागा चैतन्यसोबत 2017 मध्ये गोव्यात केलं होतं, मात्र 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सध्या नागा चैतन्यचं (Naga Chaitanya) नाव अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत जोडलं जात आहे आणि त्यांच्या लग्नाच्या बातम्याही चर्चेत आहेत. विशेष लक्षात घेण्यासारखं म्हणजे – समांथाच्या जीवनात आता नवीन सुरुवात प्रेमासाठी नाही, तर करिअरमधील एका महत्त्वाच्या वळणासाठी होत आहे. चाहत्यांना आता तिच्या निर्माती म्हणून कामगिरीची उत्सुकता लागून राहिली आहे.