20.1 C
New York

Sobhita Dhulipala :सोभिताच्या गरोदरपणाच्या चर्चांना उधाण, जवळच्या व्यक्तीची स्पष्टोक्ती

Published:

दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यची पत्नी आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला नुकतीच मुंबईत ‘वेव्हज २०२५’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तीने घातलेली साडी आणि तिचा वावर यामुळे सोशल मीडियावर चर्चांना सुरुवात झाली. विशेष म्हणजे, सोभिताने साडीचा पदर हातात धरून वारंवार पोट झाकण्याचा प्रयत्न केला, ज्यावरून अनेकांनी अंदाज बांधला की ती गरोदर आहे.

याआधीही ती सैल कपडे परिधान करत असल्याचे अनेकदा दिसले आहे आणि सोशल मीडियावरही तसे फोटो पोस्ट करते. त्यामुळे या कार्यक्रमातील तिच्या वर्तनामुळे तिच्या गरोदरपणाच्या चर्चांना आणखी उधाण आले. काहींनी असेही म्हटले की ती सध्या बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करतेय. मात्र, या चर्चांवर तिच्या जवळच्या एका व्यक्तीने ‘एका वृत्तवाहिनीला शी बोलताना सांगितले की, “हो, ती सैल कपडे घालते, पण ती गरोदर नाही.” त्यामुळे या अफवांना काही प्रमाणात उतर मिळाला आहे.

सोभिता आणि नाग चैतन्य यांनी ८ ऑगस्ट २०२५ रोजी साखरपुडा केला होता. त्याआधी नाग चैतन्यचे समंथा रुथ प्रभूसोबत लग्न झाले होते, पण चार वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. नाग चैतन्य आणि सोभिता अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आता त्यांचा एकत्र प्रवास सुरू झाला आहे. लग्नानंतर सोभिताला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे, तरीही ती आपल्या आयुष्यात सकारात्मकतेने पुढे जात आहे. लग्नानंतर देखील तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img