15.4 C
New York

Siddharth & Sara : सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकरच्या अफेअरच्या चर्चांना उधाण

Published:

गेल्या अनेक दिवसांपासून शुभमन गिल (Shubhnam Gill) आणि सारा तेंडुलकरच्या (Sara Tendulkar) नात्याबाबत सोशल मीडियावर मोठ्या चर्चा सुरु होत्या. त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांमुळे चाहते नाराज झाले असतानाच, आता सारा तेंडुलकर एका नवीन नात्यामुळे चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारा सध्या बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला(Siddhant Chaturvedi) डेट करत असल्याचं बोललं जातंय. सिद्धांत आणि सारा अनेक वेळा एकत्र पाहिले गेले असून, त्यांच्या मैत्रीतून हळूहळू प्रेम फुलत असल्याचं म्हटलं जातंय. सध्या दोघंही एकमेकांची कंपनी एन्जॉय करत असून हे नातं सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र, ते हे नातं खासगी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सिद्धांत चतुर्वेदी याचे याआधीही काही नात्यांबाबत अफवा पसरल्या होत्या. त्याचं नाव नव्या नवेली नंदा आणि मृणाल ठाकूरसोबत देखील जोडलं गेलं होतं. नव्याबरोबर तो ऋषिकेशमध्ये दिसला होता, तर मृणालसोबतचा (Mrunal Thakur) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिद्धांतने एकदा सांगितले होते की तो कॉलेजमध्ये एका मुलीशी चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होता, पण करिअरच्या कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. ‘गली बॉय’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सिद्धांतचा आगामी चित्रपट ‘धडक 2’ आहे, ज्यात तो तृप्ती डिमरीसोबत झळकणार आहे.

सुरुवातीला ती वैद्यकीय क्षेत्रात (Master’s degree in Clinical and Public Health Nutrition) शिक्षण घेत होती. सारा हिने लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून मेडिसिनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय आहे. तिने काही जाहिरातींमध्ये काम केले असून, ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img