16.8 C
New York

Lemon Juice : उन्हाळ्यात लिंबूपाणी बनवताना टाळा या 5 चुका

Published:

लिंबू पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून संरक्षण करतात. लिंबू पाणी पचनसंस्था मजबूत करते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या कमी होतात. लिंबू पाणी चयापचय (मेटाबॉलिझम) वाढवते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. यातील पेक्टिन फायबर भूक नियंत्रित करते. लिंबूमधील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेची चमक वाढवतात, सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेला निरोगी ठेवतात. लिंबू पाणी शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर टाकण्यास मदत करते आणि यकृत (लिव्हर) स्वच्छ ठेवते. लिंबू पाणी तोंडातील बॅक्टेरिया कमी करते आणि श्वासाची दुर्गंधी दूर करते. पण चुकीच्या पद्धतीने लिंबूपाणी बनवल्याने आरोग्य बिघडू शकते. चला जाणून घेऊया लिंबूपाणी बनवताना कोणत्या 5 चुका टाळाव्यात.

१. बाजारातून आणलेले लिंबू थेट कापल्यास त्यावरील धूळ, जंतू पाण्यात मिसळतात, ज्यामुळे पोटदुखी किंवा विषबाधा होऊ शकते. लिंबू कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

२. सकाळी कापलेले लिंबू संध्याकाळी वापरल्यास त्यात बॅक्टेरिया वाढतात. यामुळे गॅस, उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात. नेहमी ताजे लिंबू वापरा.

३. जास्त साखर किंवा मीठ: जास्त साखरेमुळे वजन वाढते, तर जास्त मीठ रक्तदाब वाढवते. साखर आणि मीठ चवीनुसार संतुलित मिसळा.
अस्वच्छ बाटली वापरणे: लिंबूपाणी साठवण्यासाठी वापरलेली बाटली नीट धुतली नाही तर बॅक्टेरियामुळे पोटदुखी किंवा अ‍ॅसिडिटी होऊ शकते. बाटली स्वच्छ ठेवा.

४. लिंबूपाणी बाहेर ठेवणे: बनवलेले लिंबूपाणी तासन्तास बाहेर ठेवल्यास बॅक्टेरिया वाढतात, विशेषतः उन्हाळ्यात. ते आंबट होऊन आजारपणाला निमंत्रण देऊ शकते. ताजे पाणी बनवा किंवा फ्रिजमध्ये ठेवा. या चुका टाळून लिंबूपाण्याचा आनंद घ्या आणि उन्हाळ्यात निरोगी राहा!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img