उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत. पण पहलगाम हल्ल्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Uddhav Thackeray) काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करत आहेत. आज तर संजय राऊतांनी, शरद पवारांनी अमित शाहांचा राजीनामा का मागितला नाही? असा थेट सवाल केला. संजय राऊतांच्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य नाही, पण तर्कवितर्क सुरु आहेत.
Uddhav Thackeray चर्चेला पुन्हा वेग येईल
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही टीका होत असल्यानं ठाकरे गट आघाडीतून बाहेर तर पडणार नाही ना अशी चर्चा रंगत आहे. राज ठाकरे परदेश दौऱ्याहून महाराष्ट्रात परत आलेत आणि उद्धव ठाकरे उद्या चार तारखेला परतणार आहेत. ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला त्यामुळं दोन्ही पुन्हा वेग येईल.V
आपापले मित्र पक्ष एकत्र येण्याच्या या प्रक्रियेत दोघांनीही दूर ठेवावे हा नक्कीच पहिला निकष असेल. उद्धव ठाकरे यांनी तर शिंदे आणि भाजपला दूर ठेवा अशी अटच घातलीय. त्यामुळं उद्धव ठाकरेंनाही काँग्रेस आणि शरद पवारांचा त्याग करावं लागेल. गेल्या दोन दिवसांतली संजय राऊतांची काँग्रेस आणि पवारांवरची टीका ही या त्यागाची सुरुवात तर नाही ना असा कयास बांधला जातोय.
Uddhav Thackeray पवारांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर जेव्हा चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी देखील शरद पवारांना ठाकरे बंधूंच्या युतीवर माध्यमांशी प्रश्न विचारला होता. मात्र, त्यावेळी शरद पवारांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर पुन्हा ठाण्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर माध्यमांशी प्रश्न विचारला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यावर एकत्र येत असतील तर चांगलचं आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.