राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या युतीची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी साद घातली अन् प्रतिसाद दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी महाराष्ट्रात नवे समीकरण पाहायला मिळणार का? याची चर्चा सुरू होती. सत्ताधारी आणि विरोधकांकडून याबाबत प्रतिक्रिया येत होत्या. पण तर युतीच्या चर्चा आठवडाभर होतील, असे वाटत नाही. राज ठाकरे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेही विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे युतीच्या चर्चा विदेशात होणार का? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदेशात सुट्टीवर उद्धव ठाकरे कुटुंबासोबत जाणार आहेत. उद्धव ठाकरे ४ मे पर्यंत विदेशातच राहणार आहेत. युतीच्या चर्चा त्यामुळे मे २०२५ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत तर होणार नाहीत, अशी चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे राज ठाकरेही सध्या विदेशातच आहेत. त्यामुळे काहींच्या मते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीची बोलणी विदेशात होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
Uddhav Thackeray राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना
मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या विदेशात आहेत. इकडे महाराष्ट्रात राजकारण तापले. शिवसेना-मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू झाली. मनसे नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. राज ठाकरेंनी विदेशातून मनसे सैनिकांना आदेश दिला. अतिसंवेदनशील विषयावर कोणत्याही प्रतिक्रिया, कमेंट्स करू नका. सध्या युतीवर बोलणं टाळा.. अशा सूचना आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना राज ठाकरेंनी दिल्या आहेत.
राज ठाकरे २९ एप्रिल रोजी महाराष्ट्रात परतणार आहेत. तर उद्धव ठाकरे ४ मे रोजी महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रात दोन्ही नेते परतल्यानंतरच युतीचं भवितव्य नेमकं काय? याचा अंदाज बांधला जातोय. दोन्ही नेत्यांकडून आतापर्यंत फक्त प्रसारमाध्यमांसमोर प्रतिसाद दिलाय, दोन्ही नेत्यांमध्ये थेट बोलणी झालेली नाहीत. युतीची बोलणी त्यामुळे ठाकरे बंधू विदेशात करतात की देशात, सर्वांच्या याकडे नजरा लागल्या आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये युतीची खरेच चर्चा होणार की हा फक्त राजकीय जुमला होता? हे थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे.