भारतीय क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी चाहत्यांसाठी गुड न्यूज दिली आहे. झहीर आणि सागरिका (zaheer khaan sgrika ghatge) आई- बाबा झाले असून त्यांच्या घरी गोड पाहुण्यांचं आगमन झाल आहे. सोशल मीडियाच्या माध्यातून झहीर आणि सागरिकाने ही बातमी शेअर केली आहे. या जोडप्याने मुलाचा फोटो शेअर करत चाहत्यांसोबत हा आनंदाचा क्षण साजरा केला. त्याचबरोबर मुलाचे नाव देखील जाहीर केले आहे. ”फतेहसिंह खान” असे बाळाचे नाव ठेवण्यात आले आहे. प्रत्येकजण या पोस्टवर कंमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी बाळाला आशीर्वाद देखील दिले आहेत.
सागरिकाने मराठीबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. झहीर खान हा भारतीय क्रिकेटर आहे. याशिवाय, सागरिका आणि झहीर यांच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दलही नुकतेच बरेच चर्चा झाली. सागरिकाने एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या लग्नात धर्म कधीच अडथळा ठरला नाही आणि झहीर खान मंदिरातही जातो, ज्यामुळे त्यांच्या नात्याची खासियत दिसून येते. अनेक वर्षांचं डेटिंगनंतर २३ नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. आता दोघांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. अभिनेता अंगद बेदी क्रिकेटर सुरेश रैना आणि अभिनेत्री डायना पेटीनेहि कंमेंट केली आहे. त्याचबरोबर हुमा कुरेशीहि कमेंटबॉक्समध्ये कमेंट केली आहे.
झहीर खान हा आयपीएल २०२५च्या सामन्यांमध्ये व्यस्त आहे. सध्या तोच लखनौ सुपर जायटन्सचा बॉलिंग कोच म्हणून नेतृत्व करत आहे. आतापर्यंत लखनौचे ७ सामने झाले असून ४ सामने जिंकले आहेत तर ३ सामन्यांमध्ये हार पत्करावी लागली आहे. पॉईंट टेबलवर लखनौ ५ नंबरवर आहे. १९ एप्रिल रोजी लखनौचा सामना राजस्थान रॉयल्स बरोबर होणार आहे.