संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांपैकी एक सुदर्शन घुले याने हत्या केल्याचा कबुली जबाब दिला आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक व्हावी, देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी राज्यभरात मोठ आंदोलन झालं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ही लढाई लढण्यामध्ये आघाडीवर होत्या. आता सुदर्शन घुले याने कबुली दिल्यानंतर अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“त्याने पोलिसांपुढे कबुली दिली असेल, तर ती तितकीशी ग्राह्य धरली जाणार नाही. मॅजिस्ट्रेटपुढे कबुली दिली असले, तर केस संपल्यात जमा आहे. आजच्या घटकेला घुलेने कबुली पोलिसांसमोर दिली की, मॅजिस्ट्रेटसमोर ते आपल्याला माहित नाहीय. कलम 164 की, कलम 25 खाली कबुली दिलीय ते माहित नाही. कलम 164 खाली कबुली दिली असेल, तर चांगलं आहे” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
बीडमधील राजकीय नेतेमंडळी आता हळूहळू बॅकफुटवर येत चाललीय, त्या बद्दल अंजली दमानिया म्हणाल्या की, “आता त्यांना जाणवतय की, कुठेतरी आपण बोललो, तर आपल्यावर शेकेल. आपल्याही गोष्टी बाहेर येतील. 28 डिसेंबर नंतर मी जे म्हणाले होते, ते आता घडतय”
Anjali Damania अंजली दमानिया यांची पुढची भूमिका काय?
सुरेश धस बॅकफुटवर आलेत का? “प्रश्नच नाही संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे यांना तुम्ही आता बोलाताना ऐकणार नाही. हे सगळे जण आपपाल्या ठिकाणी हेच करताना दिसतायत. एक-एक प्रकरण बाहेर येत असताना, सगळे बॅकफुटवर जाणार यात शंका नाही” तुमची पुढची भूमिका काय? यावर अंजली दमानिया म्हणाल्या की, “ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा कृषी घोटाळा यावर एकतरी आमदार अधिवेशनात बोलेल, असं मला वाटत होतं. पण कोणीच चौकशीची मागणी केली नाही. आता हाय कोर्टासमोर मी माझ म्हणणं मांडणार. आधी ठरवलेलं, थोडी वाट बघायची, अधिवेशन संपल्यानंतर मी पुढच पाऊल उचलणार होते, तसं आता करणार आहे”