पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी येथे आग लागून (Accident News) एक टेम्पो जळून खाक झाला असून त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोत होते. मात्र आग लागल्यावर टेम्पोचं मागचं दार न उघडल्याने ते कर्मचारी आतमध्येच अडकले आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळी 8 च्या सुमारास घडली. आगीत काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चौघेही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमधून प्रवास करत होते. यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्याने चार जणांना होरपळून मृत्यू झाला. यातील जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टेम्पो चालकावर उपचार सुरू आहेत. प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज 1 रोडवर, व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल MH14 CW 3548 बस ला अचानक आग लागली होती. आगीत टेम्पो मधील एकूण 12 प्रवासी पैकी 04 प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. व्योमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कल वरून रेजवानच्या दिशेने जात होती. अचानक बसला समोरून आग लागल्याने चालकाने उडी घेतली. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. बस मध्ये एकूण 15 जण होते. त्यात पुढे बसलेल्यांनी तत्काळ खाली उडी मारली आणि ते बचावले. मागच्या बाजूस बसलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो लॉक झाल्यानेचार कर्मचारी आगीत होरपळले आणि मृत पावले. ते चौघेही इंजिनिअर होते अशी माहिती समोर येत आहे. जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.