21.4 C
New York

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

Published:

राज्यात उष्णतेची लाट काहीशी ओसरली असली तरी आता पावसाचे ढग दाटू लागले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update कोठे पडणार पाऊस?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट जाणवत होती. मात्र, सध्या बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती तयार होत आहे. पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही भागांत वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरांत तापमान काहीसे घटले असले तरी उष्मा अद्याप कायम आहे.

Maharashtra Weather Update तापमानात घसरण, पण उकाडा कायम

मुंबईत गेल्या आठवड्यात तापमान 39 अंश सेल्सिअस वर गेले होते, जे आता 32 अंशांवर आले आहे. मात्र, उष्णतेची तीव्रता कमी झालेली नाही, त्यामुळे नागरिकांना फारसा दिलासा मिळालेला नाही.

Maharashtra Weather Update पुढील चार दिवस हवामान कसे असेल?

कोकण वगळता महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत तापमान काही अंशांनी घटण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागात सध्या तापमान काहीसे घटले असले तरी लवकरच पुन्हा उष्णतेची लाट परतण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update) हवामानातील हे बदल तात्पुरते असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे हा पाऊस उन्हाच्या झळा कमी करणार की फक्त एक चकवा असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img