पुण्यातील वाढत्या वाहतूक समस्यांमुळे वाहतूक (Pune Traffic) पोलिसांनी नियम अधिक कठोर केले आहेत. नवीन नियमांनुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दहापट दंड आकारण्यात येणार असून काही गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा देखील लागू करण्यात आली आहे.
Pune Traffic ड्रिंक अँड ड्राईव्हसाठी 10 हजारांचा दंड
वाहनचालकांनी मद्यप्राशन करून गाडी चालवल्यास यापूर्वी 1,000 रुपये दंड होता. मात्र आता हा दंड 10,000 रुपये इतका वाढवण्यात आला आहे. यासोबतच 6 महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची शक्यता आहे. यापूर्वी 100 रुपये दंड सीटबेल्ट न घालता वाहन चालवणे आणि दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास केल्यास होता. परंतु, आता 1,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास 1,000 रुपये दंड किंवा तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित करण्यात येईल.
Pune Traffic विमा नसलेलं वाहन चालवणं महागात
200 ते 400 रुपये दंड यापूर्वी विमा नसलेल्या वाहनांसाठीआकारला जात होता. मात्र, आता पहिल्यांदा 2,000 रुपये आणि दुसऱ्यांदा 4,000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शक्यता आहे. 5,000 रुपये दंड सिग्नल तोडणे, अतिवेगाने वाहन चालवणे, परवाना नसताना गाडी चालवणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास आकारला जाणार आहे. यापूर्वी हा दंड फक्त 500 रुपये होता.
25,000 रुपये दंड जर एखाद्या अल्पवयीन मुलाने वाहन चालवले तर त्याच्या पालकांना भरावा लागेल. तसेच 3 वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा आणि 1 वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द केली जाऊ शकते. वाहनचालकांनी हे नवीन नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा मोठा दंड आणि तुरुंगवास टळणार नाही.