32.8 C
New York

Rohini Khadse : रोहिणी खडसेंचं ‘महिला दिनी’ थेट राष्ट्रपतींना पत्र, नेमकं प्रकरण काय?

Published:

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीशी छेडछाड करण्यात आली होती. या मुद्यावरून विरोधकांनी देखील महायुती (Mahayuti) सरकारवर हल्लाबोल केला आहे. यातच आता जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पत्र लिहून देशात महिलांना एक खून माफ करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

रोहिणी खडसे आपल्या पत्रात म्हणतात की, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे… आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे.

लाडक्या बहि‍णींना सरकारने किती कोटी वाटले?

देशाची आर्थिक राजधानी दोनच दिवसांपूर्वी पूर्वी मुंबई येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, 12 वर्षीय ! विचार करा काय परिस्थिती असेल ? वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे नुकताच आला आहे अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. आशिया खंडात या सर्व्हे नुसार भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे.

आम्हाला खुन करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे.आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू. धन्यवाद!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img