14.4 C
New York

IND Vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत-न्यूझीलंडमध्ये रंगणार थरार; जाणून घ्या कसा आहे रेकॉर्ड्स

Published:

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून, दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफिमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 3 सामने खेळले असून, तिन्ही सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंड संघाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. पण त्याआधी भारत आणि न्यूझीलंडमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड्स नेमके काय सांगतात याबद्दल जाणून घेऊया.

IND Vs NZ भारत आणि न्यूझीलंडमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

जर आपण दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड्सबद्दल बोललो तर, दोन्ही संघ आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये चार वेळा एकमेकांसमोर आले आहेत, ज्यामध्ये ‘ब्लॅककॅप्स’ने म्हणजेच किवीसंघाने 3 वेळा विजय मिळवला आहे, तर भारताने फक्त एकदाच विजय मिळवला आहे.
2000 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ एकमेकांसमोर आले होते, ज्यामध्ये भारताचा पराभव झाला होता. याशिवाय, 2019 आणि 2023 च्या विश्वचषक उपांत्य फेरीत दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते. 2021 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातही एक सामना खेळवण्यात आला होता.

IND Vs NZ भारत विरुद्ध न्यूझीलंड H2H एकदिवसीय सामने

दोन्ही संघांमध्ये एकूण 119 सामने खेळले गेले ज्यात, भारतीय संघाने 61 सामने जिंकले तर, न्यूझीलंडने 50 सामन्यांमध्ये विजय मिळवला. ज्यात7 सामन्यांचा निकाल लागला नाही तर, 1 सामना बरोबरीत सुटला. भारताने घरच्या मैदानावर एकूण 31 सामन्यांमध्ये विजय नोंदवला असून, न्यूझीलंडने घरच्या मैदानावर एकूण 26 सामने जिंकले आहेत.

IND Vs NZ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-न्यूझीलंड कितीवेळा लढले?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघ दोनदा एकमेकांसमोर आले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकले आहेत. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लीग टप्प्यात टीम इंडियाने किवी संघाचा 44 धावांनी पराभव केला. यापूर्वी, 2000 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते, ज्यामध्ये न्यूझीलंडने 4 गडी राखून विजय मिळवला होता.

IND Vs NZ आयसीसी नॉकआउट्समध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड हेड-टू-हेड रेकॉर्ड्स कसे?

– खेळलेले सामने – 4
– भारताने जिंकलेले सामने – 1
– न्यूझीलंडने 3 सामने जिंकले
– अनिर्णीत -0

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img