नवी दिल्लीमध्ये नुकतेच मराठी साहित्य संमेलन पार पडले. (Shivsena UBT) यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून चांगलाच वाद पेटला आहे. त्यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले. पण त्यानंतर आता नाशिकच्या एका नेत्याने नीलम गोऱ्हे यांनी विधानसभेच्या तिकिटासाठी पैसे मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. (Shivsena UBT Nashik Shivsena UBT Vinayak Pande allegations on Nilam Gorhe)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (24 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत म्हणाले की, “नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांना उमेदवारी देण्यासाठी या बाईंनी किती पैसे घेतले, हे पांडेंना विचारा.” असे विधान केल्यानंतर स्वतः विनायक पांडे यांनी पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “2014 ची विधानसभा निवडणूक लागली मी आणि अजय बोरस्ते असे आम्ही दोघेही इच्छुक होतो. त्यावेळी नीलम गोऱ्हे यांचा भैय्या बहाते कार्यकर्ता होता. त्याने नीलम गोऱ्हे यांच्याशी बोलायचे का? असे सांगितले. त्यावेळी मी त्यांच्या भेटीसाठी होकार दिला. नीलम गोऱ्हेंनी काही रक्कम दिली, त्यांनतर अजय बोरस्ते यांना तिकीट देण्यात आले. मी त्यांना सांगितले मला पैसे द्या नाहीतर पत्रकार परिषद घ्यावी लागेल. त्यांनी मला बोलवून पैसे दिले. पण, त्यामध्येही काही पैसे कमीच दिले.” असा दावा त्यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडून पदासाठी एक रुपयाही मागितला नाही. मी शिवसेनेचा शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपमहापौर तसेच महापौर होतो. चांगले काम करतो, म्हणून ते मला पद देत गेले. शिवसेनेने मला भरभरुन दिले असून उद्धव साहेबांनी माझ्याकडून एक पैसाही घेतला नाही,” असे म्हणत विनायक पांडे यांनी उद्धव ठाकरेंवर नीलम गोऱ्हेंनी केलेले आरोप मोडीत काढले. “मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. मी बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम केले. पण काही कार्यकर्ते नवीन असतात, त्यांना सत्तेची तसेच पदाची अपेक्षा असते. ही बाई ज्या-ज्या ठिकाणी संपर्क नेता होती, तिथे त्या मातोश्रीपर्यंत पोहोचूच द्यायची नाही.” असा घणाघात त्यांनी यावेळी केला.