29.9 C
New York

PM Modi : छत्रपती शिवराय माझ्यासाठी फक्त नाव नाही, तर..मोदींनी शेअर केला एक व्हिडिओ

Published:

दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Maharaj ) मी त्यांना अभिवादन करतो, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शिवजयंतीनिमित्त व्यक्त केल्या. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी मराठी खास पोस्ट केली असून व्हिडीओ शेअर केला आहे.

PM Modi मोदींनी व्यक्त केल्या भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.

माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीये. हे फक्त राजा, महाराजा, राजपुरूष नाहीये. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आराध्य देव आहेत. आमच्यासाठी आराध्य देवापेक्षा मोठे काही असू शकत नाही”, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजाचं शौर्य, विचारधारा आणि न्याय प्रियतेने अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे. त्यांची धाडसी कार्यशैली, सामरिक कौशल्य आणि शांततापूर्ण राजकीय पद्धती आजही आपल्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत”, असेही मोदी म्हणाले आहेत.

PM Modi राजेंच्या स्वप्नातील भारत बनवायचाय

आपल्या या गोष्टीचा अभिमान आहे की जगातील अनेक देशात आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणांची चर्चा होते. आणि त्यावर संशोधन होत आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी स्थापित केलेली मूल्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी वाट दाखवत आहे. त्याच मूल्यांच्या आधारांवर आपल्याला अमृत काळाची २५ वर्षांची यात्रा पूर्ण करायची आहे. हा प्रवास असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत बनवण्याची. ही वाटचाल असेल, स्वराज्य, सुशासन आणि आत्मनिर्भरतेची. मी छत्रपती शिवाजी महारजांच्या चरणी कोटी कोटी नमन करतो”, अशा शब्दात मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img