13.7 C
New York

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार! परळी कोर्टाची नोटीस धडकली; कारण काय?

Published:

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. यातच मुंडेंना आणखी एक नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणुकीत खोटी माहिती दिली म्हणून परळी कोर्टाने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे मंत्री मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जात असल्याने त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत.

यानंतर परळी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे. येत्या 24 फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध ऑनलाइन तक्रार दिली होती. न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत मुंडेंना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होईल असे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले.

आज पुन्हा निवडणुका झाल्या तर… जनतेचा कौल कोणाला? सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा

विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी अर्ज भरला होता. या अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख होता. मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत काहीच उल्लेख नव्हता. लोकप्रतिनिधी कायदा 1991 कलम 33 अ नुसार वरील माहिती खरी देणे बंधनकारक आहे. खोटी माहिती दिली तर कलम 125 अ नुसार सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते.

यानंतर माहिती दडवली म्हणून करुणा मुंडे यांनी परळीच्या न्यायालयात धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध ऑनलाइन तक्रार दिली होती. 5 फेब्रुवारीला तक्ररीची मूळ कागदपत्रेही न्यायालयात सादर करण्यात आली. यानंतर न्यायालयाने तक्रारीची दखल घेत नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येईल. नोटीस मिळाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img