10.6 C
New York

Diwali 2024 : दिवाळी आणि नरकचतुर्दशी एक सांस्कृतिक परंपरा

Published:

भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील दिवाळी (Diwali 2024) हा एक महत्वपूर्ण सण मानला जातो. पाच दिवसांचा हा सण फारच उत्साही व मनोरंजक असतो. हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी मृत्यूची देवता यमदेव आणि भगवान श्रीकृष्णांना पूजले जाते. या दिवशी दिवाळी पहाट देखील म्हटले जाते. यादिवशी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. नरकचतुर्दशीची एक आख्यायिका आहे की नरकासुर नावाच्या राक्षसाने भुदेवीला प्रसन्न करून घेतले व देवीकडून वरदान प्राप्त करून “वैष्णवास्त्र ” मागून घेतले. त्यामुळे त्याने त्या शक्तीचा दुरुपयोग करून सर्व देवांना त्रास देण्यास सुरुवात केली व भुलोकात त्यांनी १६,००० मुलींना पळवून नेले आणि आपल्या राज्यातल्या कारावासामध्ये डांबून ठेवले. नरकासुराच्या अत्याचारामुळे सर्वजण त्रासले होते. तेव्हा इंद्रयदेवांनी श्री कृषणांचे आवाहन केले. श्रीकृष्ण आणि नरकासुर यांच्यात भीषण युद्ध सुरू झाले, आपला वध निश्चित होणार हे नरकासुराला समजले व तो श्री कृषणांना शरण गेला . मृत्यू समीप दिसता त्याने देवाकडे वर मागितले कि “आजच्या तिथीला जो कुणी यादिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये तसेच माझ्या मृत्युदिनी सर्वत्र दिप प्रजवळूण दिवाळी साजरी करावी. दिवाळीच्या दिवसांत, थंडीमध्ये अभ्यंगस्नान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे.

‘‘उठा, उठा दिवाळी आली,
मोती स्नानाची वेळ झाली..’’

ह्या ओळी कानवरपडताच आपल्याला आठवण येते ती अलार्म काका व दिवाळी पहाटची. अभ्यंगस्नान हा प्रामुख्याने भारतात दिवाळीच्या पहिल्या दिवशी केला जातो. “अभ्यन-जन” हा स्नानासाठी संस्कृत शब्द आहे. रोज अभ्यंगस्नान केल्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही. शरीराला आलेला थकवा जातो, तसेच वात दोषाचा नाश होतो. उटणं ही एक सांस्कृतिक परंपरा आहे, जी दिवाळीच्या सणासोबत जोडली गेली आहे. ती धार्मिक, शारीरिक व सामाजिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. अभ्यंगस्नानाच्या दिवशी पहाटे लवकर उठण्याची परंपरा आहे. पहाटेच्या थंडगार वातावरणामध्ये अंगाला कोमट तेल लावून मालिश करायचे आणि हळद, चंदन, कापुर, गुलाब पावडर, मुलतानी माती, वाळा, व काही अन्य औषधी वनस्पतींचा समावेश असलेल्या सुगंधीत उटणं लावून उष्ण पाण्याने अंघोळ करायची. अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर संपूर्ण वर्षभर करावे असे आयुर्वेदात म्हटले आहे. उटण्याच्या वापराणे शरीर सुगंधी, सडपातळ आणि स्थिर होते. पश्चात उष्ण पाण्याने केले जाणारे स्नान हे पचनशक्ती आणि भूक वाढवते, ऊर्जा व बल देते, तसेच खाज, मळ, घाम, आळस, आणि पाप यांचा नाश करते. उटणामध्ये वापरल्या जाणाऱ्यां घटकांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेसंबंधी समस्यांपासून आराम मिळतो. अभ्यंगस्नानानंतर नवीन कोरे सुंदर वस्त्र आणि अलंकार घालून मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे, शेजारी फराळ वाटप करणे या सगळ्या गोष्टींमुळे उत्साह, समूह सहवास आणि आनंद यांची नुसती उधळण असते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img