7.2 C
New York

Fire : मुरबाडमध्ये फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण स्फोट

Published:

मालकाच्या मुलाचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

मुरबाड

मुरबाड तालुक्यातील कोलठण गावाच्या हद्दीत आज सकाळी फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये घडलेल्या भीषण स्फोटामुळे (Fire) परिसरात एकच खळबळ उडाली. या धक्कादायक घटनेत गोडाऊन मालकाचा मुलगा मनीष याचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्फोट एवढा प्रचंड होता की त्याचा आवाज दोन ते तीन किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. परिसरात धुराचे मोठे लोळ उठल्याने गावकरी भयभीत झाले. स्फोटानंतर लगेचच मुरबाड पोलिस आणि तहसीलदार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि बचावकार्य सुरू केले. फटाक्यांच्या साठ्यामुळे झालेल्या या स्फोटाने प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. ज्वालाग्राही वस्तूंचा साठा करण्यासाठी आवश्यक परवाने घेतले होते का ? आणि गोडाऊनमध्ये योग्य ती सुरक्षा पाळली जात होती का ? या सगळ्याची सखोल चौकशी आता सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अशा प्रकारच्या दुर्घटनांवर त्वरित नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी स्फोटाच्या ठिकाणी संपूर्ण तपासणी सुरू केली आहे. तहसीलदारांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. सध्या पुढील तपास सुरू असून, दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. या भयंकर घटनेनंतर, ज्वालाग्राही पदार्थांचा साठा करणाऱ्या व्यावसायिकांनी अधिक कडक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक झाले आहे. प्रशासनाला अशा स्फोटक पदार्थांवरील नियंत्रण अधिक कडक करण्याची गरज आहे, ज्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img