11 C
New York

Harshvardhan Patil  : ‘तुतारी’ फुंकताच हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट

Published:

भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil)  शरद पवार पक्षात प्रवेश करताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यात आमचा अदृष्य सहभाग होता असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Harshvardhan Patil  काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?

पक्ष प्रवेशावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सुप्रिया ताई आम्हाला अभिमान आहे की, तुम्ही चारवेळा खासदार झाला. त्यातीन तीनवेळा तुमच्या विजयात आमचा प्रत्यक्ष सहभाग होता. पण नुकत्याचा कालपरवा पार पडलेल्या निवडणुकीत तुम्हाला विजयी करण्यात आमचा सहभाग अदृष्य होता. हर्षवर्धन पाटलांनी भर कार्यक्रमात वरील गौप्यस्फोट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, हर्षवर्धन पाटलांच्या या खुलाश्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतील पराभव आणि इंदापूरातील सुप्रिया सुळे यांच्या लीडमागे कोणाचा हात होता यावरून अखेर पडदा उचललला गेला आहे.

भाकरी पवारांच्या राष्ट्रवादीतचं फिरणार; जयंत पाटलांच नाव घेत कोल्हेंचे संकेत

Harshvardhan Patil  दत्ता भरणे-हर्षवर्धन पाटलांमध्ये होणार लढत?

पाच वर्ष भाजपसोबत राहिल्यानंतर अखेर माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर आता इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील हे तुतारी चिन्हावरील उमेदवार असतील हे निश्चित मानले जात असून, जर विरोधीपक्षाकडून दत्ता मामा भरणे यांना विधानसभेसाठी तिकीट दिले गेले तर, पुन्हा एकदा इंदापूरात प्रतिस्पर्धी असलेल्या भरणे आणि पाटील यांच्यात कडवी लढत पाहण्यास मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img