19.1 C
New York

Aaditya Thackeray : सिनेट निवडणुकीच्या विजयाचा मातोश्रीवर जल्लोष, आदित्य ठाकरे म्हणाले…

Published:

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष होते. (Aaditya Thackerayत्यानंतर अखेर 10 जागांचा निकाल समोर आला असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. सिनेट निवडणुकीमध्ये शिवसेना उबाठा गटाच्या युवासेनेने 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. तर सर्वच जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना या संघटनेने काबीज केल्या आहेत. शुक्रवारी (ता. 27 सप्टेंबर) सायंकाळी जाहीर झालेल्या या निकालानंतर शनिवारी (ता. 28 सप्टेंबर) मातोश्रीवर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानत हा “दस का दम” असल्याचे म्हटले आहे.

मातोश्रीवर सिनेट निवडणुकीच्या विजयाचा जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांना पदाधिकाऱ्यांनी खांद्यावर घेऊन जल्लोष केला. आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, उद्धव साहेब अंगार है, बाकी सब भंगार आहे, कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणाही यावेळी देण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सिनेट निवडणुकीच्या विजयाबाबत आदित्य ठाकरे मत व्यक्त करत म्हणाले की, विजय काय असतो हे काल दाखवून दिले आहे. करून दाखवले आहे. ही सुरुवात आहे. असाच विजय विधानसभेत मिळवायचा आहे. ही आजपासूनची सुरुवात आहे. गुलाल उधळला आहे. हाच गुलाल विधानसभेच्या निवडणुकीला उधळायचा आहे. त्यासाठी कामाला लागा, अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत.

महिला मुख्यमंत्री होणार?, प्रणिती शिंदे म्हणाल्या…

तसेच, हा दस का दम आहे. 2008 मध्ये 10 पैकी 8 जागा जिंकल्या. त्यानंतर दहा पैकी दहा जिंकल्या. दहा पैकी दहा जागा आता पुन्हा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. ही विधानसभेची लिटमस टेस्ट नव्हती. ही प्रिपरेशन होती. ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. जनतेचा आमच्यावर जो विश्वास आहे, तो कायम आहे. पदधवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आम्ही जिंकलो आहोत. आता सिनेटही जिंकली आहे. त्यामुळे आता ज्याप्रमाणे सर्वांनी विश्वास दाखवला, एकजूट दाखवली, अशीच एकजूट सर्वांनी विधानसभेत दाखवा आणि मविआच्या विजयाचा गुलाल उधळा असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img