10 C
New York

Senate Elections : सिनेट निवडणुका मुंबई उच्च न्यायालयाची मोठी अपडेट

Published:

महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार, 22 सप्टेंबर रोजी होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक शासनाच्या पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका (Senate Elections) पुढे ढकलल्याच्या विरोधात युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसंदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका उद्या घ्याव्यात, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर बॉम्बे युनिव्हर्सिटीने सुरक्षा आणि इतर प्रशासकीय यंत्रणांची मागणी केली. आता 24 सप्टेंबरला सिनेटची निवडणूक होणार असून 27 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

उच्च न्यायालयाचा युवासेनेला मोठा दिलासा
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घेण्यात याव्यात, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या युवा सेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आल्यानंतर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे आता मुंबई विद्यापीठाची निवडणूक मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी होणार आहे. मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img