19.1 C
New York

Big Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा राडा

Published:

Big Boss Marathi : सध्या बिग बॉसच्या घरामध्ये नवीन सदस्याची एन्ट्री झाली आहे. वाईल्ड कार्ड संग्राम चौघुलेनं घरातील सदस्यांना धारेवर घरलं आहे.घरातील सदस्यांना चांगलच धारेवर घरलं आहे. त्यामुळे घरातील इतर सदस्यांच्या गेममध्ये मोठा फरक पडलेला दिसत आहे. निक्की तांबोळी आणि अरबाज बिग बॉसच्या घरात आता चांगलेच गोत्यात अडकले आहेत. यंदा बिग बॉसचा पाचवा आठवडा सुरु आहे. दिलेल्या टास्कमध्ये आठवड्याच्या सुरुवातीलाच काही स्पर्धकांनी घरातील नियम तोडले होते.

नॉमिनेशन टास्क मंगळवारी पार पडला, यावेळी सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. वर्षा उसगावकर, अभिजित सावंत, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, आणि आर्या जाधव यंदाच्या आठवड्यसाठी हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तर काही सदस्यांमुळे बिग बॉसने घरातील काही सदस्यांना शिक्षा दिली आहे. संग्राम चौघुले यांनी नॉमिनेशन टास्कचे सुत्रसंचालन केले होते.सर्व सदस्यांची इम्युनिटी या टास्कमध्ये जादुई दिव्यात बंधिस्त होती. मात्र घरातील सर्व सदस्यांची इम्युनिटी दुसऱ्या सदस्यांच्या हाती होती. सदस्यांकडे घरातील ज्या सदस्यांचा दिवा आहे त्यांना नॉमिनेशन पासून वाचवायचं होत. हातामधील जादुई दिवा जिनीच्या हसण्याचा आवाज आल्यावर टेबलावर ठेवला जाणार नाही तो बाद होईल असे सांगितले होते. या सदस्यांमध्ये टास्कदरम्यान अनेक राडे देखील झाले.

‘जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षण..’ राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यांवर अमित शाह संतप्त

बिग बॉसने सर्व सदस्यांना टास्कदरम्यान खडसावले होते. तुम्ही खेळण्यास सातव्या आठवड्यातही अपात्र आहात तुम्हाला खेळ कसा खेळायचा याची समज नाही असे सांगितले. आर्या आणि वैभव, अभिजीत, यांच्या गोंधळामुळे ३ सदस्यांना अंतिम फेरीत नॉमिनेट केलं होत. त्यांनतर आरडाओरड आणि राडे झालेले सदस्यांमध्ये पाहायला मिळाले. कोणता सदस्य बिग बॉसच्या घराला यंदाच्या आठवड्यात राम राम करणार हे पाहाणं रंजक ठरेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img