17.6 C
New York

Gunaratna sadavarte : एसटी कर्मचाऱ्याच्या संपावरून गुणरत्न सदावर्तेंचा महाविकास आघाडीवर निशाणा

Published:

प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याचं म्हणत एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आजपासून (३ सप्टेंबर) बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील विविध आगारांमध्ये त्यानुसार कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या मुद्द्यावरून आता राजकारणदेखील तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माणसं असल्याचा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna sadavarte) यांनी केला आहे.

Gunaratna sadavarte काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

“आंदोलन जे लोक करत आहेत, महाविकास आघाडीशी म्हणजेच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संबंधित आहेत. आंदोलन काही बोटावर मोजण्याइतके आणि एसटीमधून निलंबित करण्यात आलेली लोक करत आहेत. नोकरीवर असताना प्रदीर्घ काळ रजा घेऊन मजा मारणारी ही लोक आहेत”, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. “या आंदोलनाची हाक ज्या कृती समितीने दिली आहे, ती कीडे समिती आहे,कृती समिती नाही. मलाई खाणारे ही लोक पाच टक्के लोक आहेत. यांनी लिहून देताना, धरणे आंदोलन करत असल्याचं लिहून दिलं आहे. मात्र, एसटीतील कष्टकऱ्यांना संप करण्यास सांगण्यात आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर उठलेली ही बांडगुळं आहेत”, अशी टीकाही सदावर्ते यांनी केली.

PM मोदी आजपासून सिंगापूर आणि ब्रुनेईच्या दौऱ्यावर, जाणून घ्या काय आहे अजेंडा?

पुढे बोलताना, “सर्वोच्च न्यायालयाने आम्ही आंदोलन केल्यानंतर सातव्या वेतन आयोगाबाबत विचार करण्यास सांगितलं होतं. दसऱ्या मेळाव्यालाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची कार्यवाही पूर्ण केली होती. मात्र, अडचणी आणून कृती समितीने ती होऊ दिली नाही. कारण त्यांना बीओटी तत्वावरील करारातील पाच टक्के मलाई खायची होती”, असा आरोपाही त्यांनी केला.दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या विधानावरूनही त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img