24.6 C
New York

Big Boss Marathi : बिग बॉस मराठी ५ च्या सदस्यांना बसणार शॉक, वर्षा उसगावकर….

Published:

Big Boss Marathi : सध्या बिग बॉस मराठी सीजन 5 सुरू होऊन 30 दिवस उलटून गेलेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी एकमेकांना महिन्याभरात आता चांगलाच ओळखले आहे. मात्र या सदस्यांची आज भाऊच्या धक्क्यावर परीक्षा पाहायला आपल्याला मिळणार आहे. कोण कोणाला किती आणि कितवर ओळखतं हे आज समोर येणार आहे. तसंच जर कोणी चुकीचे उत्तर दिलं तर शॉकही बसणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांची चांगलीच मजा रितेश देशमुख ने घेतल्याचं नवीन प्रोमो मध्ये दिसत आहे.

कालच्या भागांमध्ये सर्वच सदस्यांची भाऊच्या धक्क्यावर रितेशने चांगलीच खरडपट्टी काढली. तसच, गेम वरून रितेश ने त्यांना सुनावला देखील, तर काहींचं प्रत्यक्षात रितेशने कौतुकही केल. असं असताना मात्र आज बिग बॉस मराठी च्या घरातील सदस्यांना धक्काही मिळणार आहे. दरम्यान या सदस्यांसोबत थोडी मस्ती देखील करण्यात आली आहे. रितेश सदस्यांना प्रोमो मध्ये काही प्रश्न विचारत असून माणसं ओळखायला चुकलात तर शॉक बसतो असं देखील तो त्यांना म्हणाला. तर जे चुकीचे उत्तर देतील त्यांना शॉक दिला जात आहे. यामध्ये “निक्की दिवसातून किती वेळा लिपस्टिक लावते”? सूरज झापुक झपुक हा डायलॉग किती वेळा म्हणतो? असे प्रश्न देखील विचारले जाणार आहेत.

‘हा’ सरकारच्या भ्रष्टचाराचा नमूना, शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

मात्र या सगळ्या नंतर वर्षा उसगावकर अश्या म्हणतात की, “मला माझी शेवटची इच्छा विचारा”. ऐकून मात्र रितेश देशमुखला फारच हसू येतं. हा प्रोमो सध्या सोशल मीडिया वरती कमालीचा वायरल होत आहे. एकंदरीत काय तर आज भाऊच्या धक्क्यावरती मजा येणार आहे. तसंच वर्षा, निक्की, अभिजीत, अंकिता हे सर्व सदस्य आठवड्यामध्ये नॉमिनेट झाले होते. तर या सदस्यांपैकी आज बाहेर कोण जातं की काही नवीन ट्विस्ट येतो हे देखील आज पाहायला मिळणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img