24.6 C
New York

Big Boss Marathi : ‘कोकण हार्टेड गर्ल’ची ‘बिग बॉस मराठी’मधून एक्झिट?

Published:

Big Boss Marathi : ‘कोकण हार्टेड गर्ल’ची ‘बिग बॉस मराठी’मधून एक्झिटछोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली. बिग बॉस मराठीचे यंदाचे पर्व हे चांगलेच सुपरहिट ठरत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. यावेळी रितेश देशमुख सर्व सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली. तर दुसरीकडे आता बिग बॉस मराठीने प्रेक्षकांना आणखी एक धक्का दिला आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर अर्थात ‘कोकण हार्टेड गर्ल’चा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली.

घरातील सदस्यांनाही बसला धक्का


नुकतंच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरचा ‘बिग बॉस मराठी’मधला प्रवास संपल्याचे दिसत आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला रितेश देशमुख हा या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे अंकिता असे सांगतो. रितेशने अंकिताचे नाव घेतल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर अंकिता उठून तिच्या नावाची पाटी घेते आणि सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे. रितेशने अंकिताचा प्रवास संपल्याचे जाहीर करता धनंजय पवार आणि सूरजला अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहेत.

बदलापुरातील पीडित मुलींनी नराधम अक्षय शिंदेला ओळखले

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरावर कोकणाच्या चेडवाची जादू पाहायला मिळाली. पण अंकिता अचानक घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवीन प्रोमो चर्चेत


सध्या ‘बिग बॉस मराठीच्या घरात अधिकाधिक रंजक होऊ लागला आहे. मात्र त्यातच ‘बिग बॉस मराठी’च्या घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू-वालावलकर घराबाहेर पडली आहे. अंकिताने बिग बॉस मराठीचा खेळ चांगल्या खेळण्याचा प्रयत्न केला असला तरी कुठेतरी ती कमी पडल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. यावर नेटकरीही प्रतिक्रिया देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img