15.6 C
New York

Ideal Dahi Handi : यंदाची आयडियल दहीहंडी ठरणार खास, दिव्यांगानाही मिळणार हंडी फोडण्याचा मान

Published:

Ideal Dahi Handi : संपूर्ण राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. बाल गोपाळ व गोविंदा पथक आता दहीहंडी फोडण्यासाठी विविध भागांमध्ये दाखल होत आहेत. मुंबईमध्ये देखील अनेक मानाच्या दहीहंड्या आपल्याला पाहायला मिळतात. तसंच या दहीहंड्या फोडायला गोविंदा पथकांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते.”ढाकुमकुम ढाकुमकुम” च्या तालावरती ठेका भरत बाल गोपाळ आता हंड्या फोडण्यासाठी निघाले आहेत.

दादर मधील आयडियल बुक डेपो चौकातील दहीहंडी यंदा खास ठरणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून ही दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. पथनाट्यांच्या माध्यमातून विविध विषयांवरती जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये महिला पुरुषांसह दिव्यांगांसाठीही दहीहंडीचा आयोजन करण्यात आले.

दहीहंडीच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे विविध भागांमधून गोविंद पथक ही दहीहंडी फोडण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतात. यंदा देखील दादर मधल्या आयडियल बुक डेपो चौकातील दहीहंडी बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. विविध प्रकारचे देखावे देखील गोविंदा पथकाकडून या दहीहंडीमध्ये साकारले जातात. त्यामुळे दादर मधील आयडियल बुक डेपो चौकातील ही दहीहंडी नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. या दहीहंडीला बाल गोपाळांसह गोपिकांचा देखील समावेश मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या चौकामध्ये बघणाऱ्यांची गर्दी अफलातून असते. यंदा देखील आयडियल बुक डेपो चौकातील दहीहंडीने आता सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img