15.6 C
New York

Ritesh Deshmukh : रितेश देशमुख भडकला, छोट्या पुढारीने हात जोडून मागितली माफी,

Published:

Ritesh Deshmukh: बिग बॉस ५ मराठीच्या घरात रोज हंगामा होताना दिसत आहे. तसेच यावेळी रितेश घरातील सदस्यांचा क्लास लावताना देखील दिसत आहे. रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरला मोठी शिक्षा सुनावलीय. त्यामुळे आता पुढील काही दिवस मात्र, जान्हवीला जेल मध्ये राहावं लागणार आहे. तसच जान्हवीला नऊच्या धक्क्यावर देखील बसता येणार नाहीय. नुकतच पॅडी बद्दल जान्हवीने सर्वाना हैराण करणार विधान केलय. या विधानानंतर मोठा रोष पाहायला मिळाला. निकी तांबोळी हिला रितेश देशमुख याने काही व्हिडीओ दाखवले आहेत.यात निकी तांबोली हिच्या मागे तिच्याच टीममधील लोक बोलताना दिसत आहेत.

टीममधील लोकांना निकी तांबोळी हिने आता थेट मोठे चॅलेज देऊन टाकले आहे. (Big Boss Marathi)“बिग बॉस मराठी” सीजन 5 मध्ये नुकताच असा प्रकार घडलाय की, रितेश देशमुखचा प्रचंड राग पाहायला मिळाला. या रागामध्ये थेट रितेश देशमुख मंच देखील सोडून जाताना आपल्याला दिसला. याच कारणही खूप मोठं आहे. आणि रितेशच्या या रागामुळे घरातील सर्वच सदस्य हैराण झालेले पाहायला मिळाले.

छोटा पुढारी अर्थात धनश्याम दरोडे याला एक टास्क देण्यात आलाय. या मध्ये त्याला सर्वाना काही टॅग द्यायची होती. एखाद्या व्यक्तीच्या मागे कोण फिरतो असा तो टॅग होता आणि तो घरातील सदस्याला द्यायचा होता. त्यावर छोटा पुढारी अर्थात धनश्याम दरोडे असा म्हणाला की, मी कोणालाच देऊ शकत नाही. त्यावर रितेश देशमुख असे म्हणाले की, तुम्हाला हे द्यावेच लागेल घनश्याम…

शिवरायांच्या पुतळा उभारणीतही घोटाळा केला असेल – जयंत पाटील

रितेश देशमुख त्याच्यावर लगेच चिडला कारण, तो कोणाला टॅग देत न्हवता. आणि रितेश देशमुख यांचं ऐकत नसल्यामुळे ते चिडले. यावर रितेश असा म्हणाला की, टॅग दे नाहीतर तुला घराच्याबाहेर जावं लागेल. त्यावर घनश्याम मला माफ करा, माझे चुकले असे म्हणत त्याने रितेशची माफी मागितली.यावर रितेश असे म्हणाला की, हा टास्क आता इथेच संपलाय, तसेच हे नाटक त्वरित बंद करा. आणि रागात येऊन रितेश ने निर्मात्यांना देखील असे सांगितले की, हे कट करा आणि दाखवू नका… यावर छोटा पुढारी मात्र वारंवार माफी मागताना दिसत होता. प्रथमच बिग बॉसच्या मंचावर रितेश देशमुख एवढा चिडताना नेटकऱ्यांना दिसला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img