19.2 C
New York

Kangana Ranaut : शेतकरी आंदोलनाविरुद्ध केलं वक्तव्य, कंगना रणौत यांना भाजपने सुनावले खडेबोल

Published:

मुंबई

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेतकरी (Farmers) आंदोलनाविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यातच आता भाजपने (BJP) एक पत्रक जाहीर करत स्वतःला यापासून वेगळं केलं आहे. कंगना राणौत यांच्या वक्तव्याशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं या पत्रकात सांगण्यात आलं आहे. भविष्यात असे कोणतेही वक्तव्य करू नका, असा सल्ला भाजपने कंगना राणौत यांना दिला आहे. पत्रक जारी करत पक्षाने म्हटले आहेत की, कंगना रणौत यांना धोरणात्मक बाबींवर बोलण्याची परवानगी नाही किंवा त्यांना पक्षाच्या वतीने वक्तव्य करण्यासही परवानगी नाही.

शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले. नाहीतर तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोकं काहीही करू शकले असते असं वक्तव्य कंगना रणौतने केलं. यावरून राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, कंगना रणौतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने अधिकृतपणे पत्र जाहीर करत याबाबत आपली भूमिका मांडली आहे. कंगना रणौतने व्यक्त केलेले मत हे तिचं व्यक्तिगत मत आहे. तर कंगना रणौतने केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी कोणताच संबंध नाही, असं भाजपने आपल्या जाहीर केलेल्या अधिकृत पत्राद्वारे म्हटलं आहे. इतकेच नाहीतर कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप पक्षाकडून तिला चांगलंच फटकारण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंगना राणौत यांना भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ आणि सामाजिक समरसता या तत्त्वांचे पालन करणं अनिवार्य आहे, असं भाजपने स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img