24.6 C
New York

Narendra Modi : CM शिंदेंच्या PM मोदींकडे पाच मोठ्या मागण्या

Published:

जळगाव

जळगावमध्ये ‘लखपती दिदी’ (Lakhpati Didi Programme) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार रक्षा खडसे, शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव आदी उपस्थित होते. यावेळी महिला सक्षमीकरणावर भाष्य करण्यात आलं. लाडकी बहिण योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केलं. महिला सक्षम करण्याचं केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर हे स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलं, असं ते म्हणाले. महिलांना संधी दिली तर त्या जग बदलू शकतात, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. महिला जबाबदारी यशस्वी पेलू शकतात, असं अजित पवार या कार्यक्रमात म्हणाले.

महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदींचं सहकार्य आणि पाठिंबा मिळत राहिल. मोदींच्या नेतृत्वात आता शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं उद्दीष्ट आहे. मूल्य स्थिरीकरण योजनेंतर्गत बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीवर मूल्यनितीचा विचार करा. कपाशी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निश्चित विचार करतील आणि दूधाच्या मुद्द्यावरही नक्कीच विचार करतील. यासह मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. कोकणाच्या बाबतीतही केंद्र सरकारने विचार करावा, अशा काही महत्वाच्या मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

एकनाथ शिंदे म्हणाले, तुमच्यासाठी हा आनंद सोहळा आहे. जळगाव ही सोन्याची भूमी आहे. इथलं सोनं बावनकशी आहे. इथल्या बहिणीही सोन्यापेक्षा सरस आहे. ११ लाख महिला लखपती होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी योजनेचाही त्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला आहे. तीन मोफत सिलिंडर देण्याची योजना सुरू केली. मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची योजनाही हाती घेतली आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासाला आम्ही प्राधान्य देत आहोत. महिला सक्षम करण्याचं केवळ स्वप्न पाहिलं नाही तर मोदींनी हे स्वप्नपूर्ण केलं आहे. १० कोटी महिलांना त्यांनी आत्मनिर्भर केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, राज्यातील दु्ष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार नदीजोड प्रकल्पावर भर देत आहे. नीती आयोगाच्या बैठकीत मोदींनीही सांगितलं होतं की राज्य सरकारने नदीजोड प्रकल्पावर काम करावं. त्यानुसार आता मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. कोकणाच्या बाबतीतही केंद्र सरकारने विचार करावा, अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प करू या. तुमचा प्रतिसाद चांगला तुमचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या लखपती झाल्यात त्यांनी इतर महिलांना लखपती दीदी होण्यास मदत करा. राज्य सरकार भक्कमपणे तुमच्या पाठिशी उभे राहिले असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख केला. सरकारने राज्यातील महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या. 75 लाख कुटुंब बचतगटाशी जोडले. आगामी काळात ही संख्या दोन कोटींपर्यंत नेणार आहोत, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img